ज्योतिषशास्त्रात शुक्राला प्रेम, सौंदर्य, ऐशोआराम, सर्जनशीलता, धन, समृद्धी आणि वैवाहिक सुखाचा कारक ग्रह मानले गेले आहे.
कुंडलीत मजबूत शुक्र असलेले लोक आकर्षक, सर्जनशील आणि कलात्मक असतात. ते प्रेमात यशस्वी होतात. ते जीवनात ऐशोआराम आणि समृद्धीचा आनंद उपभोगतात. त्याचबरोबर ज्यांच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो त्यांना प्रेमात निराशा, आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
१९ मे २०२४ रोजी शुक्र मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या राशीतील संक्रमणामुळे काही लोकांच्या जीवनात चांगले बदल होतील. या गोचराचा सर्व राशींवर काही प्रमाणात परिणाम होईल, परंतु, ‘या’ चार राशींसाठी हे संक्रमण विशेष शुभ ठरणार आहे.
वृषभ : शुक्राचे गोचर आपल्याच राशीत होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाचा विशेष लाभ होईल. शुक्र आपल्या जीवनातील अनेक क्षेत्रात चांगले आणि सकारात्मक परिणाम घेऊन येईल. तुमची संपत्ती अनेक पटींनी वाढेल. उत्पन्नाचे अनेक नवे स्त्रोत मिळतील. उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग मिळतील. व्यवसायात अनेक नवीन संधी उपलब्ध होतील.
सिंह : शुक्राचे वृषभ राशीतील संक्रमण सिंह राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी अनेक नवीन संधी मिळतील. जे लोक बऱ्याच काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते, त्यांची प्रतीक्षा संपुष्टात येऊ शकते. नोकरीत अनेक नवीन संधी चालून येतील.
तूळ : या राशीचे लोक काही नवीन गोष्टी सुरू करू शकतील, ज्या त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतील. त्यांचा समाजात सन्मान होईल. नातेसंबंध दृढ होतील. या राशीचे अशुभ दिवस लवकरच संपुष्टात येतील. शुक्राच्या गोचरामुळे आपल्या सर्व जुन्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि व्यवसाय फायदा होईल.