(3 / 4)तूळ : शुक्राचे गोचर आपल्यासाठी लाभ घेऊन येत आहे. शुक्र तुळ राशीचा स्वामी आहे आणि हे संक्रमण आपल्या तृतीय भावात होत आहे, जे अनेक बाबतीत अत्यंत शुभ फळ देणार आहे. आई-वडील किंवा सासू-सासऱ्यांकडून वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होऊ शकतो. शुक्राचे गोचर देखील करिअरसाठी चांगले परिणाम घेऊन येत आहे. ज्यांना नोकरी बदलायची आहे किंवा दीर्घकाळ बेरोजगार आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात.