डिसेंबर २०२४ च्या अखेरीस सर्व प्रमुख ग्रहांमध्ये राशी आणि नक्षत्रांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा १२ राशीच्या जातकांवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. भौतिक सुख, कौटुंबिक सुख-संपत्ती, कला, कीर्ती, सौंदर्य, फॅशन आणि रोमान्स चा ग्रह शुक्र डिसेंबरमध्ये दोनदा भ्रमण करेल, ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनावर, करिअरवर, उत्पन्नावर आणि आरोग्यावर होईल.
वैदिक दिनदर्शिकेनुसार शुक्र २ डिसेंबर रोजी २०२४ च्या समाप्तीपूर्वी दुपारी १२ वाजून ०५ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशींवर २ आणि २८ डिसेंबरला शुभ प्रभाव राहील.
वृषभ :
शुक्र ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे वृषभ राशीच्या जातकांना भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो. दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या कामात वाढ होईल. तर कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे. वृषभ राशीच्या जातकांना मालमत्तेच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत बळ आणि स्थैर्य येईल. तसेच नवीन गुंतवणुकीच्या माध्यमातून भविष्यात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
कर्क :
या काळात व्यापाऱ्यांना गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. नोकरदार लोकांसाठी व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. तुमचा बॉस तुमच्या कामावर खूश होईल आणि मग तुमचा पगारही वाढू शकतो. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चांगली कामगिरी करतील. मुलांना हवं ते त्यांच्या पालकांकडून भेट म्हणून ही मिळू शकतं.
सिंह :
शुक्राच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन या वेळी आनंदी राहील. विवाहित व्यक्ती आणि प्रियजनांच्या वैयक्तिक जीवनात गोडवा वाढेल. वयोवृद्ध व्यक्तींना आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळेल. विद्यार्थ्यांची सर्जनशील कार्यात रुची वाढेल.
तूळ :
शुक्राच्या संक्रमणाचा तुळ राशीच्या लोकांच्या जीवनावर खूप सकारात्मक परिणाम होईल. नशिबाच्या कृपेने नोकरदार लोकांच्या योजना यशस्वी होतील. उद्योजकाचे पैसे कमावण्याचे प्रयत्न यशस्वी होतील आणि त्याची आर्थिक स्थिती सुधारेल. आगामी काळात कुटुंबात सुख-शांती राहील.
कुंभ :
व्यवसायाच्या नवीन संधी फळदायी ठरतील, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार होईल. नोकरदारांना पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी मान-सन्मानही वाढेल. व्यवसायात केलेले नवे करार फायदेशीर ठरतील. दुकानदारांची विक्री वाढेल, त्याचा थेट परिणाम नफ्यावर होईल. याशिवाय विवाहित लोकांची कोणतीही जुनी इच्छा त्यांचा जोडीदार पूर्ण करू शकतो.