Shukra Gochar: येत्या २५ ऑगस्टला शुक्राचे गोचर होणार आहे. आता हे गोचर काहींना लाभणार आहे, तर काहींचं नुकसान देखील करणार आहे. चला जाणून घेऊया…
(1 / 7)
शुक्र ग्रह तुमच्यावर कृपा करत असेल तर आलिशान जीवनशैली जगण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. इतकंच नाही, तर शुक्र ग्रह हा प्रेमाचा कारक देखील मानला जातो.
(2 / 7)
या काळात शुक्र सिंह राशीत विराजमान आहे, सिंह ही सूर्यदेवाची रास आहे. थोड्याच दिवसांत शुक्र बुधाची रास असलेल्या कन्या राशीत प्रवेश करेल.
(3 / 7)
शुक्राच्या या गोचरामुळे काही राशींना नफा होईल. तर, काहींना हा काळ कठीण जाईल. चला तर, जाणून घेऊया २५ ऑगस्टला शुक्राच्या संक्रमणाचा सर्वात जास्त फायदा कोणत्या राशींना होईल आणि कोणाला स्वतःकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
(4 / 7)
सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचे कन्या राशीत होणारे संक्रमण फायदेशीर ठरेल. आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि शांत राहील. आपण आपल्या जीवनसाथीसह डेटवर जाऊ शकता. उत्पन्न वाढीसाठी नवीन स्त्रोत मिळू शकतात. नवीन नोकरी मिळू शकते.
(5 / 7)
वृषभ: शुक्राची बदलती गती वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी गुंतवणुकीसाठी चांगला सौदा मिळू शकतो, जो फायदेशीर ठरू शकतो. पिकनिकलाही जाऊ शकता. आर्थिक लाभ होईल. जीवनात प्रेम राहील. उपासनेत अधिक रस राहील.
(6 / 7)
मेष: कन्या राशीत शुक्राचा प्रवेश मेष आणि कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार नाही. आर्थिक स्थितीत बदल होऊ शकतो. पैशांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. नकारात्मक वाटू शकते. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. आरोग्यही बिघडू शकते.
(7 / 7)
मकर: शुक्राचे हे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जात आहे. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील. जीवनात प्रेम आणि आकर्षण राहील. छोट्या-छोट्या सहलींना जाण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन कामे हाती घेता येतील. तुम्ही व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर राहाल.