ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राने २८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी मीन राशीत प्रवेश केला. तो ३१ मे पर्यंत या राशीत राहील, त्यानंतर तो मेष राशीत प्रवेश करेल.
मेष :
शुक्राचे हे गोचर तुमच्या राशीसाठी अनेक संधी घेऊन येत आहे. जसजसे उत्पन्न वाढेल तसतशी बचतही वाढेल, ज्यामुळे तुम्ही हळूहळू श्रीमंत व्हाल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ असेल. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. मित्रांसोबत आपल्या आवडत्या ठिकाणी प्रवास करू शकता. आरोग्य उत्तम राहील. अध्यात्माशी नाळ जोडता येईल.
मिथुन :
या राशीत जन्मलेल्या लोकांना शुक्राच्या या संक्रमणाचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक होईल. या पुरस्कारासाठी तुमचे नाव नामांकित होऊ शकते. बॉस तुम्हाला पदोन्नती देण्याचा विचार करू शकतात. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार कराल. नोकरीची मोठी ऑफर मिळू शकते.
तूळ : शुक्राचे हे गोचर तुळ राशीच्या लोकांसाठी अपार आनंद घेऊन येत आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रिय व्यक्तींसोबतच्या नात्यात जिव्हाळा वाढेल. व्यापाऱ्यांचा नफा वाढू लागेल. गुडघा किंवा पोटाच्या समस्येने त्रस्त लोकांना आराम मिळू शकतो. संपत्तीत वाढ होईल. करिअरमध्ये प्रगती होण्याची दाट शक्यता राहील.