शुक्र सुख, संपत्ती, धन, ऐश्वर्य आणि प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो. ११ नोव्हेंबर रोजी शुक्र तुळ राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. शुक्र ५ डिसेंबरपर्यंत या राशीत राहील. जाणून घ्या ५ डिसेंबरपर्यंत कोणत्या राशींवर शुक्राची कृपा राहील.
वृषभ :
या राशीच्या लोकांना प्रॉपर्टी, बिझनेस आदींचा फायदा होईल. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी हा आठवडा यशाचा आहे. जोडीदाराकडून फायदा होईल. दैनंदिन कामे फायदेशीर ठरतील. मनातील अस्वस्थता कायम राहील. कौटुंबिक समस्या सोडविण्याची संधी मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकते.
कुंभ :
या राशीच्या लोकांना जमीन आणि मालमत्तेच्या कामातून पैसे मिळतील. नवीन योजना आखल्या जातील पण पूर्ण होणार नाहीत. पण आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे, परंतु व्यवहारांच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. दांपत्य जीवन सुखी राहील. मुलाच्या बाजूनेही चांगले परिणाम मिळतील.
कन्या :
या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. एखादी चांगली बातमी मिळेल. प्रिय व्यक्तींशी संबंध सुधारतील. वैयक्तिक आयुष्यात असे काही बदल होऊ शकतात ज्याचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ शकतो. स्वत:ला प्रेरित ठेवा. नवीन नोकरी शोधावी लागू शकते. पत्नीसोबत वेळ घालवा. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.