शुक्र हा नऊ ग्रहांपैकी सर्वात आलिशान ग्रह आहे. तो धन, समृद्धी, विलास आणि योगांचा कारक आहे. शुक्र वृषभ आणि तुळ राशीचा स्वामी आहे. तो राक्षसांचा गुरू आहे. शुक्र महिन्यातून एकदा आपली स्थिती बदलू शकतो.
त्याच्या गोचराचा सर्व राशींवर मोठा परिणाम होणार आहे. शुक्राने वर्षभरानंतर वृषभ राशीत प्रवेश केला आहे. शुक्राच्या संक्रमणामुळे काही राशी आपल्या नशिबाचा पुरेपूर आनंद घेणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…
सिंह : शुक्र आपल्या राशीच्या दहाव्या भावात भ्रमण करत आहे. यामुळे नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. आपले वरिष्ठ आपल्या बाजूने काम करतील. इतरांबद्दल आदर वाढेल.
कर्क : शुक्राचा शुभ योग लाभणार आहे. उत्पन्नात कोणतीही कमतरता भासणार नाही. नवीन उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. व्यवसायात नवीन कल्पना मिळतील. त्यातून प्रगती होईल.भविष्यात चांगले परिणाम मिळतील.