प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो. राशीबदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. हे काही राशीसाठी चांगले तर काही राशीसाठी वाईट परिणामकारक ठरते. चैनीचा, प्रेमाचा कारक शुक्राने नुकतेच आपली राशी बदलली आहे. शुक्राच्या राशीपरिवर्तनाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होत आहे.
ज्योतिषीय गणनेनुसार शुक्र ग्रहाने रविवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी तूळ राशीतून बाहेर पडला आणि वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. यामुळे ब्रह्मयोगाची निर्मिती झाली आहे. शुक्राच्या राशीतील बदल ४ राशींसाठी अत्यंत शुभ मानला जातोय. या ४ राशींना भरपूर लाभ मिळू शकतात आणि भरपूर यश मिळू शकते. जाणून घेऊया या ४ राशींबद्दल.
कर्क :
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र राशीतील बदल अत्यंत फायदेशीर आहे. प्रेम जीवनासाठी काळ अनुकूल आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव देऊ शकतो. त्याचबरोबर विवाहितांच्या समस्याही संपुष्टात येतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
सिंह :
शुक्राचा वृश्चिक राशीतील प्रवेश सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही फायदेशीर ठरणार आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणारे वेळ अनुकूल म्हणून करू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. वाहनाचा आनंद घेता येईल. कोणतेही सरकारी काम रखडले असेल तर ते पूर्ण होऊ शकते.
वृश्चिक :
शुक्राच्या गोचरामुळे वृश्चिक राशीच्या जीवनात आराम आणि ऐशोआराम वाढेल. आर्थिक संबंधित समस्या असेल तर ती संपुष्टात येऊ शकते. आर्थिक संकट दूर होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहील. आपल्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नवीन नोकरी सुरू करायची असेल तर करू शकता. कामाच्या ठिकाणी सुधारणा होण्याची शक्यता आहे. मेहनत केल्यास यश नक्कीच मिळेल.
कुंभ :
कुंभ राशीसाठी शुक्राचे संक्रमण अत्यंत शुभ मानले जाते. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना त्यांच्या इच्छित नोकरीची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि सुधारणा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते आणि त्यांचे पदही वाढू शकते. प्रेम जीवनामध्ये सुधारणा होईल.