सर्व ग्रह ठराविक वेळी राशी बदलतात ज्यामुळे ग्रहांचा परस्पर संयोग तयार होत असतो. ग्रहांच्या संयोगाचा राशींवर शुभ-अशुभ परिणाम पडतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, १० ऑक्टोबर रोजी तूळ राशीत बुध आणि शुक्र यांची युती होईल आणि लक्ष्मीनारायण योग निर्माण होईल, जो सर्वात पवित्र योग मानला जातो.
शुक्राने १८ सप्टेंबर २०२४ रोजी तूळ राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर बुध १० ऑक्टोबर २०२४ रोजी तूळ राशीत प्रवेश करेल. अशा तऱ्हेने तूळ राशीत बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे, जो १३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यानंतर शुक्र वृश्चिक राशीत जाईल.
तूळ राशीत तयार झालेल्या या पवित्र राजयोगाचा लाभ तूळ राशीसह इतर राशींनाही होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे या राशीचे भाग्य उज्ज्वल होईल आणि त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना या राजयोगाचा फायदा होईल.
तूळ :
तूळ राशीत हा शुभ योग होणार आहे. म्हणून हा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो आहे. या काळात आनंदात प्रचंड वाढ होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात अपार आनंद मिळेल. व्यापारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक संबंधित अडचणी येणार नाहीत.
मकर :
मकर राशीच्या व्यावसायिक स्थानी लक्ष्मीनारायण योग तयार होईल, जो फायदेशीर ठरेल. या दरम्यान तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये यश मिळेल. तुम्ही बरीच प्रगती कराल. संपत्तीबरोबरच मान-सन्मानही वाढेल.