Shubman Gill Net Worth : आलीशान घर आणि गाड्यांचे कलेक्शन, २५ वर्षांचा शुभमन गिल किती कोटींचा मालक? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shubman Gill Net Worth : आलीशान घर आणि गाड्यांचे कलेक्शन, २५ वर्षांचा शुभमन गिल किती कोटींचा मालक? जाणून घ्या

Shubman Gill Net Worth : आलीशान घर आणि गाड्यांचे कलेक्शन, २५ वर्षांचा शुभमन गिल किती कोटींचा मालक? जाणून घ्या

Shubman Gill Net Worth : आलीशान घर आणि गाड्यांचे कलेक्शन, २५ वर्षांचा शुभमन गिल किती कोटींचा मालक? जाणून घ्या

Published Sep 08, 2024 01:42 PM IST
  • twitter
  • twitter
  • shubman gill net worth : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिल आज (८ सप्टेंबर) आपला २५ वा वाढदिवस साजरा करत आहे. १९९९ साली पंजाबमधील फाजिल्का शहरात आजच्या दिवशी त्याचा जन्म झाला.
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिल आज (८ सप्टेंबर) आपला २५ वा वाढदिवस साजरा करत आहे. १९९९ साली पंजाबमधील फाजिल्का शहरात आजच्या दिवशी त्याचा जन्म झाला.
twitterfacebook
share
(1 / 10)

(All photos- Shubman Gill Instagram)
लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या गिलने खूप संघर्ष केला. शुभमन गिलचे वडील लखविंदर सिंग यांनी आपल्या मुलाला शेतातच सराव करायला लावला. गिलचे वडील शेतातच मॅट टाकून गोलंदाजी करायचे. गिलच्या कारकिर्दीतील ते पहिले प्रशिक्षक होते. 
twitterfacebook
share
(2 / 10)

(Shubman Gill Instagram)
मोठ्या संघर्षानंतर शुभमन गिल आज कोट्यवधी रुपयांचा तसेच, अलीशान गाड्यांचा मालक आहे. अशा परिस्थितीत आज गिलच्या वाढदिवशी त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
twitterfacebook
share
(3 / 10)

शुभमन गिलने स्वत:ची निर्माण केलेली प्रसिद्धी आणि एवढ्या लहान वयात त्याने जमवलेली संपत्ती खरोखरच कौतुकास्पद आहे. शुभमन गिलची एकूण संपत्ती सुमारे ३२ कोटी रुपये आहे, जी त्याने त्याच्या मेहनतीतून आणि क्रिकेटच्या आवडीतून कमावली आहे. बीसीसीआय आणि ब्रँड प्रमोशन हे गिलचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. शुभमन गिल प्रमोशनच्या माध्यमातून करोडोंची कमाई करतो.
twitterfacebook
share
(4 / 10)

शुभमन गिलला २०२४ च्या BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये बढती मिळाली. त्याला बीसीसीआयचा ग्रेड ए करार मिळाला, जो वार्षिक ७ कोटी रुपये देतो. गुजरात टायटन्सने त्याला ८ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी गिलला ३ लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळते.
twitterfacebook
share
(5 / 10)

गिल जाहिरातींमधूनही चांगली कमाई करतो. गिल टाटा कॅपिटल, CEAT, भारत पे, माय 11 सर्कल सारख्या कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.
twitterfacebook
share
(6 / 10)

शुभमन गिल याच्याकडे अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत. पंजाबमधील फिरोजपूर येथे त्यांचे एक आलिशान घर आहे आणि भारतातील अनेक भागांमध्येही अनेक मालमत्ता आहेत. तथापि, या मालमत्तांची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही.
twitterfacebook
share
(7 / 10)

शुभमन गिलला आलीशान कारची आवड - शुभमन गिलकडे रेंज रोव्हर एसयूव्ही आणि महिंद्रा थार आहे. याशिवाय त्याच्या गॅरेजमध्ये इतर आलीशान वाहनांचाही समावेश आहे.
twitterfacebook
share
(8 / 10)

शुभमन गिलच्या नावावर अनेक मोठे रेकॉर्ड- शुभमन गिलने २०१९ मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. शुभमन गिल हा वनडे क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज आहे. याशिवाय शुबमन गिल हा कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू आहे.
twitterfacebook
share
(9 / 10)

तसेच, आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंच्या यादीत शुभमन गिल पहिल्या स्थानावर आहे. शुभमन गिल हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी सामन्यांमध्ये ७०० धावांचा आकडा पार करणारा फलंदाज आहे. यानंतर शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा (३८ डाव) करण्याचा विक्रमही केला आहे. 
twitterfacebook
share
(10 / 10)

इतर गॅलरीज