Janmashtami 2024 : कृष्ण जन्माष्टमी दरवर्षी श्रावणात येते. जन्माष्टमी हा सण उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी उपवास करून विशिष्ट रंगाचे कपडे परिधान केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात. या दिवशी बाळकृष्णाला प्रसन्न करण्याचे उपाय जाणून घेऊया.
(1 / 6)
भगवान श्रीकृष्णाचा रंग आणि रूप अतिशय मोहक होते, गवळणी कृष्णाची लीला पाहण्यासाठी खूप काही करायचे. श्रीकृष्णाला विशिष्ट रंगाचे कपडे खूप आवडतात, असे म्हटले जाते की, कृष्ण जन्माष्टमीला त्या रंगाचे कपडे परिधान केल्याने बाळगोपाळाचा आशीर्वाद मिळतो.
(2 / 6)
श्रीकृष्णाला गुलाबी, लाल, पिवळा आणि मोरपंखी रंग खूप आवडतात. २६ ऑगस्ट जन्माष्टमीला हे सर्व रंग बाळकृष्णाचा श्रृंगार करताना वापरणे शुभ आहे. असे मानले जाते की, यशोदा माता बाळकृष्णाला बहुतेक या रंगांचेच कपडे घालायची.
(3 / 6)
चंदनगोपी चंदन बाल गोपाळांना खूप प्रिय आहे, जन्माष्टमीच्या पूजेमध्ये त्याचा वापर करा आणि स्वतः गोपी चंदनाचा टिळा लावा. त्यामुळे तणाव दूर होतो.