आयपीएल २०२४ चा अंतिम सामना (२६ मे) श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायझर्स आणि पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा जेतेपदाचा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. केकेआरने हैदराबादचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. तर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये हैदराबादने राजस्थानचा पराभव केला.
आयपीएल २०२४ च्या फायनलआधी KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर आणि हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यांचे फोटोशूट झाले. अय्यर दुसऱ्यांदा तर कमिन्स पहिल्यांदाच आयपीएल फायनलमध्ये कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्सचे फोटोशूट चेन्नईच्या बीचवर झाले. दोघांनी बोटीवर बसून समुद्र किनाऱ्यावर आयपीएल ट्रॉफीसोबत पोज दिली.
अय्यर आणि कमिन्सने ऑटोमध्ये बसून फोटोशूटही करून घेतले. केकेआर २०१४ पासून आयपीएल ट्रॉफीची वाट पाहत आहे तर हैदराबाद २०१६ पासून आयपीएल ट्रॉफीची वाट पाहत आहे. त्यानंतर दोन्ही संघांनी प्रत्येकी एक फायनल गमावली आहे.
या मोसमात केकेआरने आतापर्यंत केवळ ३ सामने गमावले आहेत. चेपॉकच्याच मैदानावर चेन्नईविरुद्ध त्यांचा पराभव झाला होता. याशिवाय राजस्थान आणि पंजाबने केकेआरचा पराभव केला आहे.