असे म्हटले जाते की विवाहाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी भगवान शिवप्रसन्न झाले पाहिजेत. भगवान शंकर इच्छा पूर्ण करतो. धार्मिक मान्यतेनुसार १६ सोमवारचे उपवास केल्याने चांगला जीवनसाथी मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे इच्छित जीवनसाथी मिळण्यासाठी शिवाची पूजा फार महत्वाची ठरते.
पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे. पहिला श्रावण सोमवार ५ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. दुसरा श्रावण सोमवार १२ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. तिसरा श्रावण सोमवार १९ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. चौथा श्रावण सोमवार २६ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. पाचवा श्रावण सोमवार २ सप्टेंबर २०२४ रोजी आहे. अशात लग्नासंबंधी अडथळे दूर करण्यासाठी जाणून घेऊया काय उपाय करावे.
शिव-पार्वती विवाहाची घटना :
इच्छित जीवनसाथी मिळविण्यासाठी रामचरितमानसमध्ये वर्णिलेली शिव-पार्वतीच्या विवाहाची घटना श्रावण महिन्यात दररोज पूर्ण भक्तीभावाने वाचावी. हे वाचून शुभ फळ प्राप्त होते आणि इच्छित जोडीदार मिळण्याची इच्छाही पूर्ण होते.
पाच फळांचा रस :
श्रावण महिन्यात कोणत्याही शिवमंदिरात जाऊन शिवाला पाच फळांच्या रसांनी अभिषेक करावा. यामुळे लवकर लग्न होण्याची शक्यता वाढते आणि जीवनात सुरू असलेल्या वैवाहीक समस्यांपासून मुक्ती मिळते.
केशर मिश्रित पाणी :
लग्नाला उशीर होत असेल तर श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला केशर जल अर्पण करावे . असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात, यामुळे लवकर लग्न होण्याची शक्यताही वाढते.