श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा विशेष मानली जाते. सोमवार ५ ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होत आहे.
ऑगस्ट महिन्यात श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण सोमवार बरोबरच मंगळा गौरी व्रत आणि इतर वारांचे देखील खूप महत्व आहे, ज्याप्रमाणे श्रावण सोमवार हा भगवान शंकराला समर्पित आहे. त्याचप्रमाणे मंगळा गौरी व्रत देवी पार्वतीला समर्पित आहे.
श्रावण महिन्यात आपल्या पर्यावरणाचा विचार करून त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारेही सण याच महिन्यात असल्याचे आपल्याला दिसून येतील. नागपंचमी, जरा-जिवंतीका पूजन, रक्षाबंधन, पोळा, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे खास सण या महिन्यात येतात. श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर काही गोष्टी अर्पण केल्याने खास लाभ होतात.
बेलपत्र :
श्रावणातील कोणत्याही दिवशी किंवा श्रावणाच्या सोमवारी ११ बेलाची पाने आणि एक तांब्याभर पाणी शिवलिंगाला अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व समस्या दूर होतात. असे केल्याने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते.
गंगाजल :
श्रावण महिन्यात शिवलिंगाला पाण्यासोबत थोडे गंगाजल अर्पण केल्याने इच्छित वरदान मिळण्यास मदत होते, अशा परिस्थितीत जे अविवाहित आहेत त्यांनी हा उपाय अवश्य करावा.
चंदन :
शिवलिंगावरील स्थानाला अशोक सुंदरीचे स्थान म्हणतात. याचे वर्णन शिवपुराणात आहे. या ठिकाणचे पाणी शरीराच्या रोगग्रस्त भागावर लावल्याने रोग बरा होतो. येथे चंदन लावावे. असे केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते.
(Freepik)तांदूळ :
श्रावण महिन्यात किंवा श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी शिवमंदिरात किंवा घरी प्रथेप्रमाणे भगवान शंकराची पूजा करावी आणि नंतर पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. असे मानले जाते की, शिवलिंगाला तांदळासोबत जल अर्पण केल्याने आर्थिक लाभ होतो.
(Freepik)