श्रावण महिना सण-उत्सवाचा पवित्र महिना आहे. या महिन्यात अनेक महत्वाचे सण-उत्सव साजरे केले जातील. या महिन्यात अनेक महिला आणि पुरूष उपवास करतात.
वास्तुशास्त्रानुसार श्रावणाचे महत्वाचे सण उत्सव यायच्या आधीच आपले घर व्यवस्थित स्वच्छ करा, कारण हा अतिशय पवित्रा महिना मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या सणामध्ये पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबासाठी व्रत-वैकल्य करते.
जर पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा हरवला असेल, तर तुमच्या घरातील अशा गोष्टी काढून टाका, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.
वास्तुदोषांमुळे पती-पत्नीचे संबंध चांगले नसतात, प्रत्येक गोष्टीवर त्यांना भांडणाचा सामना करावा लागतो आणि नात्यात कटुता आणि अडचणी येतात.
(AFP)सण-उत्सव सुरू होण्याआधी घराती साफ-सफाई करून घ्या. तुमच्या घरात कोरडी झाडे असतील तर ती ताबडतोब काढून टाका किंवा घराबाहेर फेकून द्या, वाळलेल्या झाडांमुळे वास्तुदोष होतो.
तुमचा पलंग खिडकीसमोर आहे का ते तपासा, लगेच बदला. वास्तूनुसार पती-पत्नीच्या झोपण्याच्या जागेसमोर खिडकी नसावी, कारण त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो.