Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री २’च्या प्रमोशनसाठी हाताने रंगवलेल्या लाल सिल्क ड्रेसमध्ये श्रद्धा कपूर खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसची किंमत जाणून तुम्ही थक्क व्हाल.
(1 / 6)
'स्त्री २' या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रद्धा कपूर पुन्हा एकदा रेड लूक परिधान करून आली होती. यावेळी तिने लाल, हाताने रंगवलेल्या फ्लोरल डिझाइनसह सुंदर मिडी ड्रेस निवडला होता. लाल रंगाच्या आउटफिट्सच्या सीरिजसह मेथड ड्रेसिंग ट्रेंडमुळे तिचे ‘ट्रेंड क्वीन’ म्हणून स्थान पक्के होत आहे. चला तर मग जाणून घेऊया या फॅशन आयकॉनकडून तिचे लेटेस्ट आउटफिट आणि काही स्टाईल टिप्स….(Instagram/@shraddhakapoor)
(2 / 6)
श्रद्धाने इन्स्टाग्रामवर 'मी कशी दिसते ते सांगा', असे कॅप्शन देत अनेक भन्नाट फोटो अपलोड केले आहेत.(Instagram/@shraddhakapoor)
(3 / 6)
आकर्षक लाल रंगात डिझाइन केलेला श्रद्धाचा ड्रेस खऱ्या अर्थाने मास्टरपीस वाटतो. पिचाई शैलीत रंगवलेला आणि सिग्नेचर गोटा पट्टी भरतकामाने सजवलेला तिचा हा ड्रेस खूप सुंदर दिसत होता. (Instagram/@shraddhakapoor)
(4 / 6)
स्टेटमेंट इयररिंग्स, रिंग आणि ब्लॅक हाय हील्ससह तिने आपला लूक पूर्ण केला. डिझायनर अनिता डोंगरे ब्रँडच्या या साध्या ड्रेसची किंमत १,९९,००० रुपये म्हणजेच जवळपास २ लाख रुपये आहे.(Instagram/@shraddhakapoor)
(5 / 6)
मेकअप आर्टिस्ट श्रद्धा नायक हिच्या सहकार्याने श्रद्धाने चमकदार आयशॅडो, काजल कोटेड आयलॅशेस, ब्लश्ड गाल, चमकदार हायलायटर आणि न्यूड लिपस्टिकने सुंदर लूक क्रिएट केला होता.(Instagram/@shraddhakapoor)
(6 / 6)
हेअर स्टायलिस्ट निकिता मेननच्या मदतीने तिने आपले सुंदर, मऊ केस कर्ल केले आणि आपल्या खांद्यावर सुंदरपणे मोकळे सोडले होते. तिची ही हेअरस्टाईल तिच्या चिक ड्रेसला एकदम साजेशी होती. तर श्रद्धा कपूरने प्रभासच्या 'साहो' या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये नायिका म्हणून पदार्पण केले होते.(Instagram/@shraddhakapoor)