मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Dasara Melava: शिवसेना एक, दसरा मेळावे दोन; पाहा फोटो

Dasara Melava: शिवसेना एक, दसरा मेळावे दोन; पाहा फोटो

Oct 06, 2022 01:48 PM IST Suraj Sadashiv Yadav
  • twitter
  • twitter

  • शिवसेनेत फुटीनंतर राज्यात सत्तांतर झाले, त्यानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे काल मुंबईत पार पडले. शिवाजी पार्कवर माजी मुख्यमंत्री अन् शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा झाला.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. यामध्ये त्यांनी शिंदे गटाला गद्दारच म्हणणार असं म्हणत घणाघात केला. तसंच देशात महागाईवर बोलायला लागलं की गाईवर बोलतात असं म्हणत भाजपवर टीकास्र सोडलं.
twitterfacebookfacebook
share

(1 / 11)

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. यामध्ये त्यांनी शिंदे गटाला गद्दारच म्हणणार असं म्हणत घणाघात केला. तसंच देशात महागाईवर बोलायला लागलं की गाईवर बोलतात असं म्हणत भाजपवर टीकास्र सोडलं.(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

शिवाजी पार्कवर झालेल्या या सभेला राज्यभरातून शिवसैनिक आले होते. उद्धव ठाकरे भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले की, शिवसेनेचे काय होणार मला मात्र चिंता नव्हती. ही गर्दी बघितली तर आता प्रश्न गद्दारांचे कसे होणार. माताभगिनी, दिव्यांग सगळेच आहेत. एकनिष्ठ इथेच आहेत. ही ठाकरेंची कमाई.
twitterfacebookfacebook
share

(2 / 11)

शिवाजी पार्कवर झालेल्या या सभेला राज्यभरातून शिवसैनिक आले होते. उद्धव ठाकरे भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले की, शिवसेनेचे काय होणार मला मात्र चिंता नव्हती. ही गर्दी बघितली तर आता प्रश्न गद्दारांचे कसे होणार. माताभगिनी, दिव्यांग सगळेच आहेत. एकनिष्ठ इथेच आहेत. ही ठाकरेंची कमाई.(PTI)

दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीशेजारी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या तुरुंगात असून त्यांच्यासाठीची खुर्ची राखीव ठेवली होती.
twitterfacebookfacebook
share

(3 / 11)

दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीशेजारी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या तुरुंगात असून त्यांच्यासाठीची खुर्ची राखीव ठेवली होती.(Pratik Chorge/HT PHOTO)

दसरा मेळावा पवित्र मेळावा. ही विचारांची परंपरा लोक प्रेमाने आले. शिव्या देणे सोपे विचार देणे ही परंपरा मी पुढे नेतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
twitterfacebookfacebook
share

(4 / 11)

दसरा मेळावा पवित्र मेळावा. ही विचारांची परंपरा लोक प्रेमाने आले. शिव्या देणे सोपे विचार देणे ही परंपरा मी पुढे नेतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले.(Pratik Chorge/HT PHOTO)

दसरा मेळाव्यात भाषण सुरु करण्याआधी उद्धव ठाकरे यांनी गुडघे टेकून सर्वांना नमस्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी त्यांना हाताला धरून वर उठवलं. उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की, माझ्या जीवाभावाची गर्दी म्हणून तुमच्यासमोर नतमस्तक. याआधी मुख्यमंत्री म्हणून नतमस्तक झालो होतो. डॉक्टरांनी वाकण्याची परवानगी दिलेली नाही पण तुमच्या समोर नेहमीच नतमस्तक.""
twitterfacebookfacebook
share

(5 / 11)

दसरा मेळाव्यात भाषण सुरु करण्याआधी उद्धव ठाकरे यांनी गुडघे टेकून सर्वांना नमस्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी त्यांना हाताला धरून वर उठवलं. उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की, माझ्या जीवाभावाची गर्दी म्हणून तुमच्यासमोर नतमस्तक. याआधी मुख्यमंत्री म्हणून नतमस्तक झालो होतो. डॉक्टरांनी वाकण्याची परवानगी दिलेली नाही पण तुमच्या समोर नेहमीच नतमस्तक.""(Pratik Chorge/HT PHOTO)

रावणदहन होईल यावेळी रावण वेगळा कालानुरूप तोही बदलतो आता किती? डोक्यांचा नाही खोक्यांचा आहे असं उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले होते. शिवाजी पार्कवर खोक्यांचा रावण तयार करण्यात आला होता. त्यावर पन्नास असा अंकही लिहिलेला होता.
twitterfacebookfacebook
share

(6 / 11)

रावणदहन होईल यावेळी रावण वेगळा कालानुरूप तोही बदलतो आता किती? डोक्यांचा नाही खोक्यांचा आहे असं उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले होते. शिवाजी पार्कवर खोक्यांचा रावण तयार करण्यात आला होता. त्यावर पन्नास असा अंकही लिहिलेला होता.(Pratik Chorge/HT PHOTO)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण होण्याआधी व्यासपीठावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव जयदेव ठाकरे हे उपस्थित होते. त्यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रेमापोटी इथं आल्याचं सांगितलं. जयदेव यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगासुद्धा मेळाव्याला आले होते.
twitterfacebookfacebook
share

(7 / 11)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण होण्याआधी व्यासपीठावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव जयदेव ठाकरे हे उपस्थित होते. त्यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रेमापोटी इथं आल्याचं सांगितलं. जयदेव यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगासुद्धा मेळाव्याला आले होते.(Nitin Lawate)

बीकेसी मैदानात व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटचं भाषण ठाण्यात ज्या खुर्चीवर बसून केलं होतं ती खुर्ची ठेवण्यात आली होती. त्या खुर्चीला चाफ्याची फुले वाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिवादन केलं.
twitterfacebookfacebook
share

(8 / 11)

बीकेसी मैदानात व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटचं भाषण ठाण्यात ज्या खुर्चीवर बसून केलं होतं ती खुर्ची ठेवण्यात आली होती. त्या खुर्चीला चाफ्याची फुले वाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिवादन केलं.(Eknath Shinde Twitter)

दसरा मेळाव्याचं भाषण सुरु करण्याआधी मुख्यमंत्री शिंदे यांनी मैदानावर उपस्थित असलेल्या सर्वांनाच गुडघे टेकून हात जोडत नमस्कार केला.
twitterfacebookfacebook
share

(9 / 11)

दसरा मेळाव्याचं भाषण सुरु करण्याआधी मुख्यमंत्री शिंदे यांनी मैदानावर उपस्थित असलेल्या सर्वांनाच गुडघे टेकून हात जोडत नमस्कार केला.(Eknath Shinde Twitter)

तुम्ही न्यायालयात जावून शिवाजी पार्क मिळवलं, मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे पण मी ठरवलं होतं की या मैदानात आणि मैदान देण्यात हस्तक्षेप करायचा नाही. मैदान जरी मिळालं तरी शिवसेना प्रमुखांची भूमिका आमच्यासोबत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्यात म्हटलं.
twitterfacebookfacebook
share

(10 / 11)

तुम्ही न्यायालयात जावून शिवाजी पार्क मिळवलं, मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे पण मी ठरवलं होतं की या मैदानात आणि मैदान देण्यात हस्तक्षेप करायचा नाही. मैदान जरी मिळालं तरी शिवसेना प्रमुखांची भूमिका आमच्यासोबत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्यात म्हटलं.(HT PHOTO)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण तब्बल दीड तास सुरू होतं. दरम्यान, बराच वेळ झाल्यानं काही कार्यकर्ते निघून गेले होते, त्यामुळे अनेक ठिकाणी खुर्च्या रिकाम्या असल्याचं चित्र बघायला मिळालं.
twitterfacebookfacebook
share

(11 / 11)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण तब्बल दीड तास सुरू होतं. दरम्यान, बराच वेळ झाल्यानं काही कार्यकर्ते निघून गेले होते, त्यामुळे अनेक ठिकाणी खुर्च्या रिकाम्या असल्याचं चित्र बघायला मिळालं.

WhatsApp channel

इतर गॅलरीज