Shiva: पहिल्याच परीक्षेत शिवाने मारली बाजी; आशुचं मन जिंकण्यासाठी गुरुजींकडून मिळाला खास आशीर्वाद!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shiva: पहिल्याच परीक्षेत शिवाने मारली बाजी; आशुचं मन जिंकण्यासाठी गुरुजींकडून मिळाला खास आशीर्वाद!

Shiva: पहिल्याच परीक्षेत शिवाने मारली बाजी; आशुचं मन जिंकण्यासाठी गुरुजींकडून मिळाला खास आशीर्वाद!

Shiva: पहिल्याच परीक्षेत शिवाने मारली बाजी; आशुचं मन जिंकण्यासाठी गुरुजींकडून मिळाला खास आशीर्वाद!

Published Jul 10, 2024 05:56 PM IST
  • twitter
  • twitter
Shiva Marathi TV Serial: शिवा आशुला मित्र बनून राहूया असा सल्ला देते. मात्र, एकाच रूममध्ये राहताना आशु आणि शिवा यांच्यात गडबड होते आणि ते एकमेकांच्या अंगावर पडतात.
'शिवा' मालिकेत शिवा आणि आशूच्या लग्नानंतरचे सोहळे अजून सुरूच आहेत. यातच आता दोघांना मिळून एक आणखी परंपरा पार पाडावी लागणार आहे. दोघांनीही आता देव दर्शनाची परंपरा पार पाडली आहे. नवदाम्पत्याचे देव दर्शन नुकतेच पाहायला मिळाले. देवदर्शनासाठी आशु-शिवा मंदिरात पोहचले होते. त्याचवेळेस तिथे चंदन-दिव्याही आले होते.
twitterfacebook
share
(1 / 5)

यावेळी मंदिराच्या पायऱ्या चढत असताना शिवाचा तोल गेला. पण, आशुने तिला वेळीच सावरले. इथे तर आशुने, शिवाला सावरले, पण सीताई समोर शिवाची बाजू कोण घेईल? तिच्या पाठीशी कोण उभं राहील? यासाठी मात्र तो पुढे येत नाही.
twitterfacebook
share
(2 / 5)

मंदिरात शिवाला तिचं गोत्र विचारल्यावर तिची तारंबळ उडते आणि सीताईला शिवावर रागवायची अजून एक संधी मिळते. पण, यावेळी भाऊ शिवाला सांभाळून घेतात. शिवाने पूजेसाठी बनवलेला प्रसाद उत्तम झाला आहे, असे गुरूजी सांगताच रामभाऊंच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. रामभाऊ शिवाने पहिली परीक्षा पार केली म्हणून तिचं कौतुक करतात.
twitterfacebook
share
(3 / 5)

तर शिवा आणि आशुला एकत्र पाहून दिव्याची खूप चिडचीड होते. मंदिराच्या परिसरात शिवाला गुरुजी भेटतात. दुर्गेच्या रूपातील सून तुम्हाला मिळाली, असं गुरूजी सर्वांसमोर सीताईला सांगतात. हीच मुलगी तुमच्या मुलासाठी योग्य असल्याचं भाकीत खरं ठरल्याचं गुरूजी आठवण करून देतात आणि शिवाला बाजूला घेऊन दोघांमधले गैरसमज संपले की, नातं एकदम सुंदर होईल असे सांगतात.
twitterfacebook
share
(4 / 5)

शिवा आशुला मित्र बनून राहूया असा सल्ला देते. मात्र, एकाच रूममध्ये राहताना आशु आणि शिवा यांच्यात गडबड होते आणि ते एकमेकांच्या अंगावर पडतात. आता शिवा संसाराची कसोटी यशस्वीपणे पार करू शकेल का?  शिवाला, या नवीन आयुष्यात आशुच्या मैत्रीची साथ लाभेल का? शिवा-आशुचं लग्न झालंय हे कळल्यावर दिव्या काय करेल? हे लवकरच कळणार आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज