Shikhar Dhawan Records : शिखर धवनचे ५ महारेकॉर्ड, जे विराट-रोहितही करू शकले नाहीत, पाहा-shikhar dhawan 5 biggest records in international cricket see in pictures shikhar dhawan retirenment ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shikhar Dhawan Records : शिखर धवनचे ५ महारेकॉर्ड, जे विराट-रोहितही करू शकले नाहीत, पाहा

Shikhar Dhawan Records : शिखर धवनचे ५ महारेकॉर्ड, जे विराट-रोहितही करू शकले नाहीत, पाहा

Aug 24, 2024 10:13 AM IST
  • twitter
  • twitter
  • टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन याने शनिवारी (२४ ऑगस्ट) सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. गब्बरला बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात संधी मिळत नव्हती. अशा परिस्थितीत त्याने आता निवृत्ती जाहीर केली आहे.
शिखरने भारतासाठी ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी-20 सामने खेळले आहेत. गब्बरने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. आपण येथे शिखर धवनच्या ५ महान रेकॉर्डबद्दल जाणून घेणार आहोत.
share
(1 / 6)

पदार्पणाच्या कसोटीत वेगवान शतकाचा विक्रम- शिखर धवनने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शतक झळकावले. इतकेच नाही तर कसोटी पदार्पणात सर्वात जलद शतक झळकावणारा तो फलंदाज ठरला. गब्बरने अवघ्या ८५ चेंडूत शतक झळकावले होते.
share
(2 / 6)

१०० व्या वनडे सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय- आपल्या १०० व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा शिखर धवन हा पहिला भारतीय फलंदाज आहे. २०१८ मध्ये त्याने ही कामगिरी केली होती.
share
(3 / 6)

वनडेत भारतासाठी सर्वात जलद २००० आणि ३००० धावा करणारा फलंदाज-  शिखर धवनच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्येही एक खास विक्रम आहे. त्याने वनडे फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वात जलद २००० आणि ३००० धावा केल्या आहेत.
share
(4 / 6)

कसोटी पदार्पणातील फलंदाजाची सर्वात वेगवान खेळी- शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत १७४ चेंडूत १८७ धावा केल्या होत्या. कसोटी पदार्पणातील कोणत्याही फलंदाजाची ही सर्वात वेगवान खेळी होती.
share
(5 / 6)

एका कॅलेंडर वर्षात टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा- एका कॅलेंडर वर्षात टी-२० मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही शिखर धवनच्या नावावर आहे. त्याने एका कॅलेंडर वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ६८९ धावा केल्या होत्या. हा पराक्रम भारताच्या इतर कोणत्याही फलंदाजाला आतापर्यंत करता आलेला नाही.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज