(1 / 5)‘हीरामंडी: द डायमंड बाजार’मधील ‘नवाब झुल्फीकार’ अर्थात बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाला आहे. मात्र, यावेळी अभिनेत्याने काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शेखर सुमन याने आज (७ मे) नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षात अर्थात भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी शेखर सुमन याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.