अभिनेत्री शहनाज गिल नुकतीच अमृतसरला पोहोचली आहे. यावेळी तिने अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरात डोके टेकवून प्रार्थना केली. अभिनेत्रीने आता तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
(All Photos: Instagram)बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी शहनाज गिल सध्या तिच्या आगामी 'सब फर्स्ट क्लास' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान ती अमृतसरला पोहोचली आहे.
अमृतसरमध्ये पोहोचलेली शहनाज गिल तिच्या भावासोबत सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेली होती. याचे फोटो तिने आता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शहनाज अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे. यात तिने आपल्या डोक्यावर चुन्नी बांधली आहे आणि दर्शन घेत आहे.
सुवर्ण मंदिरात पोहोचलेल्या शहनाजच्या चेहऱ्यावर वेगळीच शांतता दिसली. या सोबतच पंजाबी कुडी शहनाज गिल तिच्या गावी देखील पोहोचली होती.