Navratri vrat 2023 : नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपवास ठेवतात. काही जण संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात तर काही जण पहिल्या व शेवटच्या दिवशी उपवास करतात. मात्र, हा उपवास करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
(1 / 9)
आदिशक्ती दुर्गा देवीला समर्पित असलेला पवित्र सण म्हणजे नवरात्री. हा सण यंदा १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. नवरात्रीच्या काळात ९ दिवस देवीची प्रतिष्ठापना केली जाते व तिची मनोभावे पूजा केली जाते.
(2 / 9)
नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा केल्याने देवी प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते, असं मानलं जातं. त्यामुळं हा उपवास योग्य पद्धतीनं करायला हवा. उपवास करणाऱ्या लोकांनी नवरात्रीमध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. काय आहेत या गोष्टी?
(3 / 9)
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रीच्या महत्त्वाच्या विधींपैकी हा एक विधी असतो. प्रतिपदा तिथीला ही स्थापना केली जाते. नवरात्रीचं व्रत करणाऱ्यांनी प्रतिपदा तिथीपासून दशमीपर्यंत अखंड दिवा लावावा. एवढंच नाही तर नवरात्रीच्या रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती करावी.
(4 / 9)
नवरात्रीत दररोज देवीच्या वेगवेगळ्या अवतारांची पूजा केली जाते. पूजेच्या वेळी विविध स्वरूपातील देवीला लाल वस्त्र नेसवून, लाल फुलं अर्पण करावीत. असं केल्यानं देवी दुर्गा प्रसन्न होते, असं म्हणतात.
(5 / 9)
देवीच्या सर्व स्वरूपांना वेगवेगळा साज चढवून नैवेद्य अर्पण करावा. असं केल्यानं देवी भक्तांवर कृपादृष्टी ठेवते.
(6 / 9)
दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या काळात कुणाच्याही विषयी सूडाची भावना बाळगू नये. देवीच्या सेवेकडं जास्तीत जास्त लक्ष द्यावं. अशानं घरात सुख, समृद्धी आणि समृद्धी येते.
(7 / 9)
नवरात्रीचा उपवास करणाऱ्या देवी भक्तांनी इतरांवर टीका करणं किंवा गॉसिप करणं टाळावं. या काळात गरिबांना मदत करावी. त्यामुळं देवी प्रसन्न् होते.
(8 / 9)
नवरात्रीचा उपवास करणार्या भक्तांनी या काळात मुंडण किंवा केस कापणं टाळावं. तसं केल्यास दुर्गा देवीचा कोप होऊ शकतो, असं मानलं जातं.
(9 / 9)
डिस्क्लेमर: या लेखात देण्यात आलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.