मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  CWG 2022 closing ceremony: समारोप समारंभात निखत आणि शरथ भारताचे ध्वजवाहक

CWG 2022 closing ceremony: समारोप समारंभात निखत आणि शरथ भारताचे ध्वजवाहक

Aug 08, 2022 07:04 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • CWG 2022 closing ceremony: इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज (८ ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. हे खेळ आज संपणार असून याचा समारोप समारंभही होणार आहे. या समारोप समारंभात पुन्हा एकदा सर्व देशांचे नवे ध्वजवाहक असणार आहेत. भारताकडून ही जबाबदारी बॉक्सर निखत झरीन आणि टेबल टेनिस चॅम्पियन शरथ कमल यांना देण्यात आली आहे.

समारोप समारंभात टेबल टेनिस स्टार शरथ कमल आणि महिला बॉक्सर निखत जरीन भारताचे ध्वजवाहक असतील. उद्घाटन समारंभात बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे ध्वजवाहक होते. भारतीय संघ प्रमुख राजेश भंडारी यांनी ही माहिती दिली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

४० वर्षीय शरथने या खेळांमध्ये चांगली कामगिरी करत एकूण ४ पदके जिंकली आहेत. त्याने पुरुष सांघिक आणि मिश्र सांघिकमध्ये सुवर्णपदक, तर पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावले. त्याने पुरुष एकेरीतही सुवर्णपदक पटकावले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

तर बॉक्सर निखत जरीनने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. निखतने ४८-५० किलो फ्लायवेट फायनलमध्ये उत्तर आयर्लंडच्या कार्ली एमसी नॉलचा ५-० असा पराभव केला. बॉक्सिंगमधील भारतीय संघाचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

भारताने१०व्या दिवशी म्हणजे रविवारी एकूण १५ पदके जिंकली होती. ११व्या दिवशी भारत आता पदकतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत २२ सुवर्ण, १५  रौप्य आणि २३ कांस्य पदके आहेत. ऑस्ट्रेलियाने ६६ सुवर्ण, ५५ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

दुसरीकडे, यजमान इंग्लंड ५५ सुवर्ण पदकांसह दुसऱ्या तर कॅनडा २२ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर १९ सुवर्णपदकांसह न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

दरम्यान चाहत्यांना कॉमनवेल्थचा समारोप सोहळा टीव्हीवर सोनी सिक्स, सोनी टेन 2, सोनी टेन 3 आणि सोनी टेन 4 वर पाहता येईल. मोबाईलवर सोनी लिव्ह या अॅपच्या माध्यमातून पाहता येईल. बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी १२:३० वाजता हा सोहळा सुरू होईल.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

उद्घाटन समारंभात बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे ध्वजवाहक होते.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

Sharath Kamal, Nikhat Zareen
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

Sharath Kamal, Nikhat Zareen

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज