Shani-Shukra Yuti : मित्र ग्रह मानले जाणारे शुक्र आणि शनी यांची भेट यावर्षी २८ डिसेंबर रोजी होणार आहे. या संयोगामुळे पुढील वर्षी अनेक राशींचे नशीब उजळणार आहे.
(1 / 5)
वैदिक शास्त्रात शुक्राला धन, वैभव आणि सौंदर्याचा स्वामी मानले आहे. तर, शनिदेवाला कर्मफलदाता म्हटले जाते. शनी कर्मानुसार योग्य फळ देणारा ग्रह आहे. ज्योतिषींच्या मते शुक्र आणि शनी हे मित्र ग्रह मानले जातात.
(2 / 5)
हे दोन शक्तिशाली ग्रह यावर्षी २८ डिसेंबरला कुंभ राशीत युती करणार आहेत. या दोन ग्रहांच्या संयोगामुळे ३ राशींमध्ये अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत त्या तीन राशी.
(3 / 5)
मेष : शुक्र आणि शनीचे गोचर या राशीसाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. ज्यांनी शेअर बाजारात पैसे गुंतवले आहेत, त्यांना चांगला परतावा मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबियांशी गप्पा मारण्याची संधी मिळेल. करिअरला गती मिळेल.
(4 / 5)
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना शुक्राचा लाभ होईल. या संयोजनात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात विद्यार्थी अभ्यासात यशस्वी होतील. कामात मोठी जबाबदारी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावा मिळू शकतो. तुमची रखडलेली कामे संपतील.
(5 / 5)
कुंभ : शुक्र आणि शनी या राशीत भ्रमण करीत असल्याचे ज्योतिषांचे मत आहे. त्यामुळे तो तुमच्यासाठी सुवर्णकाळ घेऊन येईल. आपले नवीन व्यावसायिक संबंध तयार होतील, आपल्या व्यवसायाचा विस्तार होईल. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि उत्पन्नात वाढ होईल.