वैदिक ज्योतिषात शनीला विशेष स्थान आहे. शनीच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. पण यावेळी शनिदेव एकटा नसून तो शुक्रदेव आणि सूर्यदेव यांच्या बरोबरीने भाग्य बदलेल, शनिची सूर्व व शुक्र सोबत युती होईल.
वैदिक ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार, शनी आधीच कुंभ राशीमध्ये विराजमान आहे, जिथे ७ मार्च रोजी सकाळी १० वाजून ३३ मिनिटांनी शुक्र देखील कुंभ राशीत प्रवेश करेल.
सूर्यदेव, शनिदेव आणि शुक्रदेव मिळून कोणाचे नशीब बदलणार? आर्थिक मदत कोणाला मिळणार? कोणाचे कुटुंब सुखाने भरून जाईल? जाणून घ्या त्या भाग्यवान राशींची नावे.
वृषभ:
या राशीच्या ११व्या स्थानी शनि, शुक्र आणि सूर्य यांची युती होत आहे. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेअर बाजारात नफा कमवू शकता. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. अचानक आर्थिक लाभ होईल. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल व मालामाल होण्याची संधी मिळेल.
मिथुन:
या राशीच्या नवव्या भावात शनि-शुक्र आणि सूर्याची युती होत असून, ही युती भाग्यदायक ठरेल. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाचा भाग व्हाल. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. जीवनात सुख-समृद्धी वाढेल.
मकर:
धन आणि संवादाच्या स्थानी शनि, शुक्र आणि सूर्याची युती तुम्हाला आर्थिक बळ देईल. अचानक आर्थिक लाभ तुम्हाला मजबूत स्थितीत आणेल. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. करिअर आणि व्यवसाय या दोन्हीमध्ये प्रगती निश्चित आहे. कौटुंबिक जीवन देखील आनंदी होईल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)