ज्योतिषशास्त्रात शनीला महत्त्वाचे स्थान आहे. २९ जून रोजी शनी वक्री गतीने कुंभ राशीत फिरण्यास सुरुवात झाली आहे. असे मानले जाते की, शनीच्या या काळात नकारात्मक प्रभाव जास्त असतो. शनी वक्री गतीत असताना राशीनुसार कोणत्या प्रकारचे दान करावे ते जाणून घेऊया…
मिथुन राशीच्या व्यक्तींनी पन्ना, कापूर, तूप, पिवळे फूल आणि मधाचे दान करावे. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल.
कर्क राशीच्या व्यक्तींनी मोहरीचे तेल, तूप, पांढरे कापड आणि दही दान करावे. यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या सुधारतील.
सिंह राशीच्या व्यक्तींनी पितळ्याची भांडी, आले, गूळ आणि साखर दान करावी, जेणेकरून ते व्यवसाय आणि कार्यात यशस्वी होतील.
कन्या राशीच्या व्यक्तींनी तांदूळ, मूगडाळ, मोहरीचे तेल, दही इ. दान केल्याने शिक्षण, व्यवसाय व आर्थिक स्थिती सुधारेल.
तूळ राशीचे लोक पांढरे कपडे, मध, आले आणि गूळ दान करू शकतात. या दानामुळे त्यांचे सामाजिक क्षेत्रातील यश वाढेल.
धनु राशीच्या लोकांनी गायींना तूप, साखर, भुईमूग आणि गूळ दान करावे. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल.