नऊ ग्रहांपैकी एक असलेल्या शनिला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे, ज्याला कर्म आणि न्यायाची देवता देखील मानले जाते. वैदिक पंचांगाच्या गणनेनुसार वर्ष २०२५ साली शनिदेव १३८ दिवस मंद गतीने वक्री म्हणजेच उलट दिशेने फिरेल.
पंचांगानुसार, वर्ष २०२५ मध्ये, शनि १३ जुलै, रविवारी सकाळी ९ वाजून ३६ मिनिटापासून मीन राशीतच वक्री होईल, जो २८ नोव्हेंबरपर्यंत या स्थितीत राहील. त्यामुळे काही लोकांच्या अडचणी वाढतील. शनीच्या वक्री चालीमुळे शनीच्या वक्री संक्रमणाचा काही राशींना फटका बसणार आहे.
मेष :
शनिच्या वक्री चालीचा मेष राशीवर प्रभाव पडेल. या काळात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, कामात दिरंगाई होईल, तुमच्या करिअर आणि व्यवसायात मोठे अडथळे येऊ शकतात.
कर्क :
कर्क राशीच्या व्यक्तींनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नशिबाची साथ लाभायला तुम्हाला थोडा वेळ लागेल. मेहनत केली तरी अडचणी येण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांचा कंटाळा येऊ शकतो. वरिष्ठांशी बोलताना सावधगिरी बाळगा.