नवग्रहांमध्ये शनिदेव कर्माची फळे देणारा आहे. त्याचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम कारक ठरते. शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षे लागतात. कर्मानुसार फळ देणे हे त्याचे काम आहे.
शनी देवाची सर्वांनाच भीती वाटते. आता भगवान शनी ३० वर्षांनंतर कुंभ राशीत भ्रमण करीत आहेत. शनि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. प्रत्येक राशीसाठी शनीची स्थिती खूप महत्त्वाची असते.
सर्वांवर त्याचा परिणाम होतो.
११ फेब्रुवारी रोजी शनी ग्रह कुंभ राशीत अस्त झाला. २६ मार्चला शनि उदय होईल. या काळात सर्व राशींवर परिणाम होईल. पण काही राशी भाग्यवान ठरतील. यात तुमची रास आहे का आणि काय लाभ होईल ते जाणून घ्या.
मिथुन:
तुमच्या राशीच्या नवव्या भावात शनि अस्त आहे. तुम्हाला विविध फायदे मिळतील. शनिदेव शुभ योगाचा लाभ करवून देतील. पूर्ण सहकार्य उपलब्ध होईल. उत्पन्नात कोणतीही घट होणार नाही. व्यवसायात चांगली प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल.
कर्क :
तुमच्या राशीच्या आठव्या भावात शनिदेव आहे. सर्व काही तुमच्या बाजूने असेल. कामातील अडचणी कमी होतील. नवीन नोकऱ्या मिळू शकतात. नवीन प्रकल्प मार्गी लागतील. आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे.
सिंह :
शनीच्या अस्तामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. विविध बाबींमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये चांगली प्रगती होईल. बेरोजगारांना चांगल्या नोकऱ्या मिळतील. लाभच लाभाचा काळ राहील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)