मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shani Jayanti : ६ जूनला शनैश्चर जयंती; या राशींवर शनीची साडेसाती, हे उपाय ठरतील उपयुक्त

Shani Jayanti : ६ जूनला शनैश्चर जयंती; या राशींवर शनीची साडेसाती, हे उपाय ठरतील उपयुक्त

May 30, 2024 09:59 AM IST
  • twitter
  • twitter
Shani jayanti 2024 : जून महिन्यात शनैश्चर जयंती आहे. आपण जसे कर्म करतो तसे त्याचे फळ मिळते. शनि हा कर्माच्या आधारावर फळ देणारा ग्रह असून, शनि साडेसाती सुरू झाल्यास कोणते उपाय उपयुक्त ठरतात ते जाणून घ्या.
शनि जयंती दरवर्षी वैशाख महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार यंदा शनि जयंती ६ जून रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी न्यायाची देवता शनिदेवाची विशेष पूजा केली जाते. शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होतात, शनि प्रसन्न असेल तर तो गरीब माणसालाही राजा बनवतो अशी मान्यता आहे.
share
(1 / 6)

या राशींवर शनीची साडेसाती: मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना सध्या साडे सातीचा त्रास आहे. अशा स्थितीत या सर्व राशींच्या जातकांनी शनि जयंतीला काही विशेष उपाय करावेत, ज्याद्वारे शनीचा प्रकोप कमी होऊ शकतो.
share
(2 / 6)

साडे सातीचे उपाय : साडे सातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.
share
(3 / 6)
साडे सातीचे उपाय : साडे सातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.(Freepik )
शनि जयंतीला भगवान श्रीकृष्णाचीही पूजा करावी. भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे आणि बासरी अर्पण करा. यामुळे साडे सातीचा प्रभाव कमी होतो.
share
(4 / 6)

शनि जयंतीला हनुमानाला वस्त्र अर्पण करा आणि हनुमान चालिसाचा ११ वेळा पाठ करावा. यामुळे शनि साडेसातीपासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते.
share
(5 / 6)

शनि जयंतीला दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी चामड्याची चप्पल, बूट, काळी छत्री, घोंगडी, काळी उडीद डाळ, मीठ इत्यादी दान करावे. टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज