ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे महत्त्व अतिशय मोठे आहे. शनि कर्यामफलदाता आहे. शनिची नजर वेगवेगळ्या वेळी अनेक ग्रहांवर पडते. त्याचा प्रभाव शुभ किंवा अशुभ असू शकतो. त्यामुळे अनेक राशीच्या लोकांना भरपूर लाभ होऊ शकतो. यावेळी शनीची तिसरी दृष्टी मंगळावर पडत आहे. याचा जसा अनेक राशींवर चांगला परिणाम होत आहे, तसाच अनेक राशींवर त्याचा वाईट परिणाम होत आहे. पाहूयात कोणत्या राशींवर चांगला प्रभाव पडत आहे.
शनी आता कुंभ राशीत, तर मंगळ मेष राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे अनेक राशीच्या लोकांना भरपूर लाभ होणार आहे. यामुळे संपत्तीत वाढ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी…
मेष: एखाद्या शुभ कार्याचे संकेत मिळू शकतात. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची संधी आहे. पगारवाढ होऊ शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो. आपल्या उत्पन्नाच्या आनंदाचा लाभ वाढू शकतो. तुम्ही जे काही काम कराल, त्या कामात तुम्हाला नफा मिळेल. नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. कुटुंबात आनंदाची बातमी मिळेल.
मिथुन: नोकरदारांसाठी हा काळ चांगला असणार आहे. जे बेरोजगार आहेत त्यांना मोठा नफा मिळेल. परदेशात प्रवास करू शकता. स्पर्धा परीक्षांमध्ये मोठे यश मिळेल. मनातील विविध इच्छा पूर्ण होऊ शकतात. एखादी योजना असेल, तर ती पूर्ण होऊ शकते, त्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.