नऊ ग्रहांमध्ये शनी कर्मफलदाता आहे. तो प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ देतो. आता शनी त्याची वक्री चाल चालत असून, याचा सगळ्या राशींवर परिणाम होणार आहे. यात काही राशींना जॅकपॉट लागणार आहे.
शनिदेवाला सर्वजण घाबरतात. कारण, तो आपल्या कर्मानुसार प्रत्येकाला फळ देत असतो. ३० जून रोजी वक्री प्रवासाला निघाला आहे. त्याचा प्रभाव सर्व राशींवर नक्कीच होणार आहे. मात्र, काही राशींना नशिबाचा चांगला अनुभव येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी...
मिथुन : शनी देवाचा वक्री प्रवास तुम्हाला चांगला योग देईल. योग्य प्रयत्नाने चांगले यश मिळेल. विविध स्त्रोतांकडून पैशांची आवक होऊ शकते. रखडलेल्या सर्व गोष्टी यशस्वी होतील.
सिंह : शनीचा वक्री प्रवास तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. व्यवसायात चांगला फायदा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या बाजूने काम करतील. हाती घेतलेली सर्व कामे यशस्वी होतील.
कुंभ : शनी देवाचे संक्रमण आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. हाती घेतलेली सर्व कामे यशस्वी होतील. सर्व काही तुमच्यानुसार होईल. नवीन संधी आणि सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. पैशांची कमतरता भासणार नाही.