ज्योतिषशास्त्रात शनिदेव हा संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लागतो. सध्या कुंभ राशीत असलेला शनी अडीच वर्षे पूर्ण करेल आणि २०२५ मध्ये मीन राशीत भ्रमण करेल. शनिदेव जेव्हा मीन राशीत जाईल, तेव्हा त्याचा परिणाम पाच राशींवर होणार आहे. शनिदेव २९ मार्च २०२५ रोजी कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करतील. जाणून घ्या शनीच्या गोचराचा कुणावर वाईट परिणाम होईल…
मेष : शनीचा पहिला टप्पा मेष राशीतील संक्रमणाने सुरू होतो. मेष राशीसाठी शनीच्या प्रभावाचा पहिला टप्पा अडीच वर्षे चालणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागेल.
मीन : शनी मीन राशीत प्रवेश केल्यानंतर या राशीचा दुसरा टप्पा सुरू होतो. हा दुसरा टप्पा अतिशय घातक मानला जातो. अशा परिस्थितीत २९ मार्च २०२५ पासूनची पुढची अडीच वर्षे मीन राशीसाठी अत्यंत वेदनादायी असतील.
कुंभ : शनी ग्रहाचा दुसरा टप्पा सध्या शनिच्या स्वतःच्या राशीत कुंभ राशीत होत आहे. शनिदेव मीन राशीत जात असल्याने कुंभ राशीत शनीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू होईल. २०२७ मध्ये कुंभ राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागेल. मात्र, मध्यंतरी शनीच्या कृपेने परिस्थिती सुधारेल.
धनु : शनीच्या मीन राशीच्या गोचरामुळे धनु राशीला शनिदेवाचा त्रास होईल. शनी मीन राशीत गेल्यावर धनु राशीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. या काळात धनहानी होण्याची शक्यता आहे. परंतु २०२७ पर्यंत धनु राशीला धन आणि आनंद परत मिळेल.