शनी हा नवग्रहांपैकी एक आहे. नऊ ग्रहांपैकी शनी हा असा ग्रह आहे जो हळूहळू भ्रमण करतो. शनीचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यास अडीच वर्षे लागतात. शनी दुहेरी भ्रमण करतो त्यामुळे सर्वजण शनीला घाबरतात.
२९ जूनच्या रात्री कुंभ राशीतील शनी वक्री मार्गाने वाटचाल करण्यास सुरवात करेल. त्याचा परिणाम सर्व राशींवर झाला, तरी काही राशींना अनुकूल परिणाम मिळतील. चला तर मग पाहूयात ‘या’ कोणत्या राशी आहेत.
कन्या : शनीचा वक्री प्रवास तुम्हाला चांगले फळ देईल. जिथे काम कराल तिथे पदोन्नती आणि पगार वाढेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या बाजूने काम करतील. या काळात चांगली प्रगती कराल.
मेष : शनीचा वक्री प्रवास तुमच्या बाजूने आहे.भाग्यप्राप्त व्हाल. सर्व प्रलंबित कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत आनंदाचे वातावरण राहील.