२०२४ हे वर्ष आता येत्या काही दिवसांत संपत आहे. त्यामुळे २०२५ हे नवे वर्ष येणार आहे. पुढील वर्षी अनेक शक्तिशाली ग्रहांचे संक्रमण होणार आहे, ज्याचा सर्व राशींवर वेगवेगळा प्रभाव पडेल. या शक्तिशाली ग्रहांपैकी एक म्हणजे शनी, जो सर्वात धीम्या गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनी दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो.
आता शनी पुढील वर्षी २९ मार्च २०२५ रोजी भ्रमण करणार आहे , शनी स्वत:ची कुंभ राशी सोडून गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल. मग अडीच वर्षे या राशीत राहून मेष राशीत संक्रमण करेल. शनीचे मीन राशीतील गोचर सर्व राशींवर परिणाम करणार आहे परंतु त्याचा प्रभाव ३ राशींमध्ये सर्वाधिक असणार आहे . चला तर मग जाणून घेऊया कोणत्या भाग्यवान राशींवर शनिची कृपा होणार आहे.
वृषभ :
या राशीच्या लोकांसाठी शनी अकराव्या भावात प्रवेश करेल. ज्यामुळे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत होईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. बऱ्याच दिवसांपासून न सुटलेली तुमची कामे पूर्ण होतील. आपण आतापर्यंत केलेल्या सर्व परिश्रमाचे फळ मिळविण्याची वेळ आली आहे. कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम कामगिरी करण्यात यशस्वी व्हाल.
मिथुन :
या राशीच्या बाबतीत शनी दशम भावात भ्रमण करेल, ज्यामुळे तुमचे करिअर सुधारेल. या राशीबदलामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. व्यवसाय फायदेशीर ठरेल.