शनिदेवांना कर्मदाता मानले जाते. तो ना मित्र आहे ना शत्रू. तो व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो. ३० वर्षांनंतर शनि ग्रह कुंभ राशीत अस्त होणार आहे. कुंभ राशीत शनिची सूर्याशी युती होईल. या संयोगात शनी सूर्याच्या अगदी जवळ येणार आहे.
सूर्य आणि शनी पिता-पुत्र यांचे संबंध चांगले मानले जात नाहीत, त्यामुळे काही राशींसाठी हे संक्रमण अवघड जाणार आहे. प्रकृती बिघडण्याबरोबरच त्यांना आर्थिक नुकसान होण्याचाही धोका आहे. जाणून घेऊया शनीच्या अस्त होण्यामुळे कोणत्या राशींना नुकसान होईल आणि ते टाळण्यासाठी त्यांनी कोणते उपाय करावेत.
मिथुन :
तुमच्या कुंडलीतील नवव्या भावात शनी अस्त होईल. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. अचानक तुम्हाला खूप खर्च करावा लागू शकतो जो तुम्ही आधी विचारही केला नव्हता. वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजीपूर्वक वाहन चालवा. एखाद्याला दिलेले पैसे गमावले जाऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांशी वाद विवाद टाळा. त्यातून केवळ दबाव निर्माण होईल.
सिंह :
शनीचे अस्त होणे सिंह राशीसाठी त्रासदायक ठरू शकते. विवाहित जोडप्यांना त्यांच्या नात्यात अडचणी येऊ शकतात. पती-पत्नीमधील वादामुळे कौटुंबिक वातावरण बिघडू शकते. नोकरदार लोकांचे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात, ज्याचा त्यांच्या करिअरवर वाईट परिणाम होऊ शकतो. या काळात केलेल्या गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकते.
तूळ :
या राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनिदेव पाचव्या भावात अस्त होईल. अशा वेळी शनिदेवाची अस्त स्थिती या राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. तुमची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे बाहेरचे खाणे-पिणे टाळा. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल.
शनीचे वाईट परिणाम टाळण्यासाठी काही उपाय :
शनीचे वाईट परिणाम टाळण्यासाठी शनिवारी जवळच्या शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करावे. तसेच तेथे बसून शनि चालीसा पठण करून मंत्रोच्चार करावा. अशा वेळी कोणत्याही परिस्थितीत शनिदेवाच्या डोळ्यात पाहण्याची चूक करू नका.
शनिवारी काळ्या कुत्र्यांना भाकरी खायला घाला किंवा कावळ्यांना धान्य खाऊ घाला, हे शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीवर शनीचा होणारा वाईट परिणाम टळू शकतो.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)