वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या मित्र आणि शत्रू ग्रहांमध्ये संक्रमण करतात. ज्याचा परिणाम देश, जग आणि मानवी जीवनावर दिसून येतो. शनी सध्या कुंभ राशीत अस्त होत आहे आणि १५ मार्च रोजी ग्रहांचा अधिपती मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
यामुळे मंगळ आणि शनि या प्रतिकूल ग्रहांची युती कुंभ राशीत होणार आहे. हे दुर्लभ योग ३० वर्षांनंतर तयार होत आहे. त्यामुळे काही राशींच्या अडचणी वाढू शकतात.
या अशुभ युतीमुळे परिणामी, काही राशींना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांनी यावेळी काळजी घ्यावी आणि या प्रभावामुळे कोणकोण अडचणीत येऊ शकतात.
कर्क:
कर्क राशीच्या लोकांसाठी शनि आणि मंगळाचा हा संयोग प्रतिकूल असू शकतो. कारण ही युती तुमच्या राशीत आठव्या भावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला कोणत्याही छुप्या आजाराचा त्रास होऊ शकतो. तसेच काही जुने आजार दिसू शकतात. या काळात तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. अपघाताचा धोका आहे. तसेच यावेळी नवीन गुंतवणूक टाळावी. कारण नुकसान होण्याचा धोका असतो. तुम्ही शनीच्या प्रभावाखाली आहात, त्यामुळे या काळात तुम्हाला तणावाचा अनुभव येऊ शकतो. सल्ला दिला जातो की याकाळात रागावू नका, रागावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक :
शनि आणि मंगळाचा संयोग तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो. कारण हा संयोग तुमच्या राशीत चौथ्या स्थानी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. तुमची तब्येतही बिघडलेली असेल. या काळात कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळावे. व्यवसायात कोणताही बदल करू नका. या काळात आईसोबतचे नाते बिघडू शकते. तसेच शनीची साडेसाती तुमच्यावर आहे. म्हणून, आरोग्याबद्दल विशेषतः सावधगिरी बाळगली पाहिजे.
मीन:
मंगळ आणि शनीची जोडी तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. कारण हा योग तुमच्या कुंडलीच्या बाराव्या स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमच्यावर काही खोटे आरोप केले जाऊ शकतात. काही अनावश्यक खर्चही होऊ शकतात. तसेच, यावेळी तुमच्यावर कर्ज असू शकते. याशिवाय, तुम्हाला काही गोष्टींबद्दल तणाव असू शकतो, जेव्हा आपण व्यवसायाबद्दल बोलतो तेव्हा काही समस्या उद्भवू शकतात. आर्थिक नुकसानास सामोरे जावे लागू शकते. तसेच तुमचे उधार घेतलेले पैसे बुडू शकतात. त्यामुळे कर्ज देणे टाळा. या काळात तुमचे आरोग्य बिघडू शकते, त्यामुळे निष्काळजी राहू नका.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)