शनाया कपूर अजूनपर्यंत अभिनय क्षेत्रापासून दूर आहे मात्र सोशल मीडियावर तिचा जलवा कायम आहे. नुकतेच शनाया कपूर एका फॅशन शोमध्ये रँप वॉक करताना दिसली होती. रँपवरील तिच्या मदमस्त अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
या फोटोंमध्ये शनाया कपूर एका फॅशन शोमध्ये रँपवर आपला जलवा दाखवताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या रँप वॉकचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
शनाया कपूर व्हाइट कलरच्या मिरर वर्लक लेहंग्यात किलर अंदाजात दिसत आहे. मिरर लेहंग्यात तिचे सौंदर्य अजून खुलून दिसत आहे.
शनाया कपूरने आपल्या या एलिगेंट लुकला हाई-हील्ससोबत एक्सेसराइज केले आहे. स्मोकी मेकअपसह केस लाइट कर्ली स्टाइलमध्ये मोकळे सोडून कॅमेऱ्यासमोर एकाहून एक पोज दिल्या आहेत.