पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू शाहीन आफ्रिदीने माजी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न केले आहे. शाहीनच्या लग्नाचे फोटो त्यानेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यानंतर सर्व स्तरातून शाहीनचे अभिनंदन होत आहे. या दोघांच्या लग्नाची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. शाहीनने कराचीत कुटुंबियांच्या उपस्थितीत मुस्लिम रितीरिवाजांनी लग्न केले.
पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, शाहीन आणि अंशाचा मेहंदी सेरेमनी गुरुवारी रात्री पार पडला. यानंतर दोघांनी शुक्रवारी (३ फेब्रुवारी) कराचीमध्ये लग्न केले.
शाहीन आफ्रिदीच्या लग्नात त्याच्या जवळच्या मित्रांसह पाकिस्तान क्रिकेट संघाचे अनेक खेळाडूही उपस्थित होते. शाहीनच्या लग्नानंतर बाबर आझमने त्याला मिठी मारून शुभेच्छा दिल्या.
शाहीन शाह आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदी यांची जवळपास दोन वर्षांपूर्वी एंगेजमेंट झाली होती. त्याच वेळी, आता दोघेही वैवाहिक बंधनात बांधले गेले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमसह अनेक क्रिकेटपटू शाहीन शाह आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदीच्या लग्नात सहभागी झाले होते.
याशिवाय पाकिस्तान सुपर लीग टीम लाहोर कलंदर्सच्या अधिकृत ट्विटर हँडलने शाहीन आफ्रिदीला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी लाहोर कलंदरच्या इतर खेळाडूंनीही शाहीनला शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहीन आपल्या कामगिरीमुळे खूप चर्चेत असतो. त्याने अनेक मोठ्या प्रसंगी संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. शाहीन आफ्रिदी पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर संघाकडून खेळतो.