मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  शाहीन-शादाब ते मार्श-मार्करम आणि केएल-ऋतुराजपर्यंत... या क्रिकेटपटूंनी यंदा केलं लग्न

शाहीन-शादाब ते मार्श-मार्करम आणि केएल-ऋतुराजपर्यंत... या क्रिकेटपटूंनी यंदा केलं लग्न

Dec 30, 2023 02:15 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Cricketers Married in 2023: यंदा म्हणजेच, २०२३ मध्ये क्रिकेट जगतातील अनेक क्रिकेटपटू लग्नाच्या बंधनात अडकले आहे. २०२३ या वर्षाला निरोप देताना यंदा कोण कोणत्या क्रिकेटपटूंनी लग्न केलं, हे जाणून घेणार आहोत.

टीम इंडियासाठी यंदाचे वर्ष म्हणजेच २०२३ हे वर्ष लग्नाचे राहिले आहे. या वर्षात टीम इंडियाच्या ७ क्रिकेटपटूंनी लग्न केले. सोबतच क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजही या वर्षी लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. २०२३ मध्ये कोणत्या क्रिकेटपटूंनी लग्न केलं, हे येथे जाणून घेणार आहोत. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 15)

पाकिस्तानी क्रिकेटर शान मसूदने यंदा त्याची मंगेतर निशा खानसोबत (२१ जानेवारी) लग्नगाठ बांधली. पेशावर येथे झालेल्या शानदार सोहळ्यात दोघांनी निकाह केला. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 15)

 भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज केएल राहुलने २३ जानेवारी २०२३ रोजी बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले. अथिया ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 15)

 भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मिताली पारुलकरसोबत लग्न केले. लग्नाआधी २०२१ मध्ये शार्दुल आणि मितालीचा साखरपुडा झाला होता.
twitterfacebookfacebook
share

(4 / 15)

 भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने २७ जानेवारी २०२३ रोजी त्याची गर्लफ्रेंड मेहा पटेलसोबत लग्न केले. दोघांचे लग्न वडोदरात झाले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 15)

भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने ८ जून २०२३ रोजी रचनासोबत लग्न केले. दुखापतीमुळे संघाबाहेर असताना कृष्णाने लग्नगाठ बांधली.
twitterfacebookfacebook
share

(6 / 15)

बऱ्याच काळापासून संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने २४ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्न केले. त्याने त्याची मैत्रीण स्वाती अस्थाना हिच्याशी लग्न केले.
twitterfacebookfacebook
share

(7 / 15)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार एडन मार्कराम यावर्षी २२ जुलै रोजी विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड निकोल डॅनियल ओ'कॉनर हिच्यासोबत लग्न केले. दोघेही ११ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 15)

चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू तुषार देशपांडे हादेखील यंदा विवाहबंधनात अडकला. तुषारने या वर्षी डिसेंबरमध्ये नभा गड्डमवार हिच्यासोबत लग्नगाठ बांधली
twitterfacebookfacebook
share

(9 / 15)

भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने ३ जून २०२३ रोजी उत्कर्षा पवारसोबत लग्न केले. उत्कर्षा ही देखील एक क्रिकेटपटू आहे. ती महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळते. 
twitterfacebookfacebook
share

(10 / 15)

भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने नुकतेच २८ नोव्हेंबर रोजी लग्न केले. मुकेशने दिव्या सिंगशी लग्न केले. 
twitterfacebookfacebook
share

(11 / 15)

मुंबईचा युवा खेळाडू सरफराज खान हादेखील यंदा  विवाहबंधनात अडकला. मुंबईत जन्मलेल्या २५ वर्षीय सरफराजने एका काश्मिरी मुलीशी लग्न केले. सर्फराजच्या पत्नीचे नाव रोमना जहूर आहे. त्यांचे लग्न काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील पाशपोरा गावात झाले.
twitterfacebookfacebook
share

(12 / 15)

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यंदा (३ फेब्रुवारी) विवाहबंधनात अडकला. माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशासोबत त्याचे लग्न झाले.
twitterfacebookfacebook
share

(13 / 15)

शादाब खानने पाकिस्तान संघाचे माजी प्रशिक्षक आणि माजी दिग्गज फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक यांच्या मुलीशी लग्न केले. शादाब यंदा २३ जानेवारीला विवाह बंधनात अडकला.
twitterfacebookfacebook
share

(14 / 15)

ऑस्ट्रेलियन स्टार ऑलराउंडर मिचेल मार्श यंदा (१० एप्रिल) विवाह बंधनात अडकला. त्याने त्याची मैत्रीण ग्रेटा मार्कशी लग्न केले. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या मार्शने लग्नासाठी आयपीएलमधून एका आठवड्याचा ब्रेक घेतला होता.
twitterfacebookfacebook
share

(15 / 15)

ऑस्ट्रेलियन स्टार ऑलराउंडर मिचेल मार्श यंदा (१० एप्रिल) विवाह बंधनात अडकला. त्याने त्याची मैत्रीण ग्रेटा मार्कशी लग्न केले. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या मार्शने लग्नासाठी आयपीएलमधून एका आठवड्याचा ब्रेक घेतला होता.

WhatsApp channel

इतर गॅलरीज