बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांचीही कारकीर्द त्यांच्या चित्रपटांच्या सतत कमाईवर अवलंबून असते. कारण एकदा चित्रपट फ्लॉप होऊ लागले की निर्माते आणि दिग्दर्शक त्यांना कास्ट करणे बंद करतात. त्यामुळेच शाहरुख खानसारखा सुपरस्टारसुद्धा अभिनयासोबतच उत्पन्नाचे गणित बिघडू नये म्हणून काही ना काही साईड बिझनेस करत राहतो. चला तर मग जाणून घेऊया इंडस्ट्रीतील काही बड्या स्टार्सच्या कमाईचे इतर स्रोत कोणते आहेत
जेव्हा शाहरुख खानचे चित्रपट परत फ्लॉप होऊ लागले तेव्हा त्याच्या स्टारडमवर प्रश्न उपस्थित केले गेले. किंग खानने काही आठवड्यांचा गॅप घेतला त्यानंतर त्याने धमाकेदार पुनरागमन केले. पण तुम्हाला माहित आहे का की अशा फावल्या वेळेत शाहरुख अनेक साइड बिझनेस देखील सुरु केले. शाहरुख रेड चिलीज एंटरटेनमेंट नावाची प्रोडक्शन कंपनी सुरु केली. याशिवाय त्याची KKR नावाची आयपीएल टीम आहे आणि त्याची मीर फाउंडेशन नावाची एनजीओ देखील आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानची उपस्थिती चित्रपटाच्या यशाची हमी देते. सलमान खानचा बीईंग ह्युमन नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे आणि त्याच्याकडे बीईंग स्ट्राँग नावाची फिटनेस उपकरणे आणि जिम चेन देखील आहे.
अक्षय कुमारच्या साईड बिझनेसबद्दल बोलायचे तर तो फिटनेस इंडस्ट्रीशी देखील संबंधित आहे आणि त्याचा तळवलकर नावाचा प्रसिद्ध ब्रँड आहे. याशिवाय त्याची हरी ओम एंटरटेनमेंट नावाची प्रोडक्शन कंपनीही आहे.
सुनील शेट्टी हे फिटनेस इंडस्ट्रीशी देखील संबंधित आहेत आणि याशिवाय त्यांच्याकडे H2O आणि Mischief नावाची वॉटर थीम रेस्टॉरंटची साखळी आहे.