(1 / 8)बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याने एकापाठोपाठ अनेक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. डंकी, जवान आणि पठाण यांसारख्या चित्रपटांनंतर आता चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मात्र, या चित्रपटांची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.