बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचे नाव इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांमध्ये घेतले जाते. आज आम्ही तुम्हाला किंग खानच्या त्या चित्रपटांची नावे सांगत आहोत, ज्यात त्याने एकही रुपया न घेता फुकटात काम केले आहे.
कमल हसनच्या 'हे राम' या चित्रपटात काम करण्यासाठी शाहरुख खानने कोणतीही फी घेतली नाही. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८ आहे.
रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात शाहरुख खानने कॅमिओ केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने या चित्रपटात काम करण्यासाठी कोणतीही फी घेतली नाही.
२०१६मध्ये रणबीर आणि ऐश्वर्याचा 'ए दिल है मुश्किल' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुखचा कॅमिओ होता. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने या चित्रपटासाठी कोणतेही पैसे घेतले नाहीत.
२०२२ मध्ये आर माधवनचा 'रॉकेट्री द नंबी इफेक्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुखची छोटीशी भूमिका होती. या चित्रपटात शाहरुखने कोणतीही फी घेतली नाही.
२००८मध्ये, 'क्रेझी ४' हा कॉमेडी थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील एका गाण्यात शाहरुख खानने परफॉर्म केले होते. या परफॉर्मन्ससाठी शाहरुखने कोणतीही फी घेतली नाही.
'भूतनाथ रिटर्न्स' हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासाठी शाहरुखने कोणतीही फी घेतली नाही.