चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघांमध्ये कसोटी सामना खेळला जात आहे. आज (२८ जून) या सामन्याचा पहिला दिवस असून पहिल्याच दिवशी टीम इंडियाची सलामीवीर शेफाली वर्माने शानदार कामगिरी केली.
(PTI)शेफालीने भारतीय महिला क्रिकेटमधील २२ वर्षांचा दुष्काळ संपवला. या सामन्यात शेफालीने द्विशतक झळकावले.
(PTI)भारतीय महिला क्रिकेटपटूने २२ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर द्विशतक झळकावले आहे. शेफालीपूर्वी हे काम भारताची माजी कर्णधार मिताली राजने केले होते. मितालीने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावले होते आणि २१४ धावांची इनिंग खेळली होती.
(PTI)मात्र, द्विशतक झळकावल्यानंतर शेफाली फार काळ टिकू शकली नाही. जेमिमाह रॉड्रिग्ससोबत धाव घेताना तिने तिची विकेट गमावली. शेफालीने १९७ चेंडूंचा सामना करत २३ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने २०५ धावा केल्या.
या सामन्यात शेफालीला तिची सलामीची जोडीदार स्मृती मानधनाने साथ दिली. मंधानाने १६१ चेंडूत १४९ धावांची खेळी केली. या खेळीत तिने २७ चौकार आणि १ षटकार लगावला.
(PTI)शेफाली आणि मानधनाने पहिल्या विकेटसाठी २९२ धावांची विक्रमी भागीदारी केली. शेफाली आणि मंधाना यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीचा पाकिस्तानचा २० वर्ष जुना विक्रमही मोडला.
२००४ मध्ये पाकिस्तानच्या किरण बलोच आणि साजिदा शाह यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या विकेटसाठी २४१ धावांची भागीदारी केली होती. शेफाली आणि मानधना यांनी ही धावसंख्या पार केली.
(PTI)