Men's Health: गोळ्या न खाता नैसर्गिकरित्या वाढवा स्पर्म काउंट, पण कसे? जाणून घ्या-sexual life tips remedies to increase sperm count naturally for men ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Men's Health: गोळ्या न खाता नैसर्गिकरित्या वाढवा स्पर्म काउंट, पण कसे? जाणून घ्या

Men's Health: गोळ्या न खाता नैसर्गिकरित्या वाढवा स्पर्म काउंट, पण कसे? जाणून घ्या

Men's Health: गोळ्या न खाता नैसर्गिकरित्या वाढवा स्पर्म काउंट, पण कसे? जाणून घ्या

Aug 31, 2024 01:01 PM IST
  • twitter
  • twitter
increase sperm count naturally for men:  वंध्यत्व तुम्हाला वाटते त्यापेक्षा अधिक व्यापक आहे. हे केवळ महिलांमध्येच होत नाही तर पुरुषांनाही याचा फटका बसतो.
जर तुम्ही किंवा तुमचा जोडीदार प्रजनन क्षमतेच्या समस्यांना तोंड देत असाल, तर हे जाणून घ्या की, या समस्येने फक्त तुम्हालाच त्रास होत नाही, तुमच्यासारखे बरेच लोक आहेत. वंध्यत्व तुम्हाला वाटते त्यापेक्षा अधिक व्यापक आहे. हे केवळ महिलांमध्येच होत नाही तर पुरुषांनाही याचा फटका बसतो. 
share
(1 / 7)
जर तुम्ही किंवा तुमचा जोडीदार प्रजनन क्षमतेच्या समस्यांना तोंड देत असाल, तर हे जाणून घ्या की, या समस्येने फक्त तुम्हालाच त्रास होत नाही, तुमच्यासारखे बरेच लोक आहेत. वंध्यत्व तुम्हाला वाटते त्यापेक्षा अधिक व्यापक आहे. हे केवळ महिलांमध्येच होत नाही तर पुरुषांनाही याचा फटका बसतो. (pexel)
विशेषतः जर पुरुषांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यातील वंध्यत्वाचे मुख्य कारण म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी होणे हे असते. मात्र पूरक आहार आणि जीवनशैलीत बदल करून शुक्राणूंची कमतरता दूर करून प्रजनन क्षमता वाढवता येते. यासाठी लगेच औषधे घेण्याची गरज नाही.
share
(2 / 7)
विशेषतः जर पुरुषांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यातील वंध्यत्वाचे मुख्य कारण म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी होणे हे असते. मात्र पूरक आहार आणि जीवनशैलीत बदल करून शुक्राणूंची कमतरता दूर करून प्रजनन क्षमता वाढवता येते. यासाठी लगेच औषधे घेण्याची गरज नाही.(pexel)
व्यायाम- तुम्हाला माहित आहे का की, दररोज व्यायाम केल्याने तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळीदेखील वाढू शकते.  आणि प्रजनन क्षमता सुधारू शकते. वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या पुरुषांपेक्षा नियमित व्यायाम करणाऱ्या पुरुषांमध्ये वीर्य गुणवत्ता आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असते. परंतु जास्त व्यायाम करू नका, कारण याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे शारीरिक हालचाली वाढवण्याचा प्रयत्न करा. 
share
(3 / 7)
व्यायाम- तुम्हाला माहित आहे का की, दररोज व्यायाम केल्याने तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळीदेखील वाढू शकते.  आणि प्रजनन क्षमता सुधारू शकते. वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या पुरुषांपेक्षा नियमित व्यायाम करणाऱ्या पुरुषांमध्ये वीर्य गुणवत्ता आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असते. परंतु जास्त व्यायाम करू नका, कारण याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे शारीरिक हालचाली वाढवण्याचा प्रयत्न करा. (pexel)
आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश-तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन सीमध्ये तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता आहे. व्हिटॅमिन सी आणि इतर अँटिऑक्सिडंट पूरक देखील प्रजनन क्षमता सुधारू शकतात. व्हिटॅमिन सीचा पुरेसा आहार घेतल्याने शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता सुधारते. हे निष्क्रिय शुक्राणू पेशींची संख्यादेखील कमी करते. 
share
(4 / 7)
आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश-तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन सीमध्ये तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता आहे. व्हिटॅमिन सी आणि इतर अँटिऑक्सिडंट पूरक देखील प्रजनन क्षमता सुधारू शकतात. व्हिटॅमिन सीचा पुरेसा आहार घेतल्याने शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता सुधारते. हे निष्क्रिय शुक्राणू पेशींची संख्यादेखील कमी करते. (pexel)
झिंकचे सेवन फायदेशीर-झिंक हे मासे, मांस, अंडी यासारख्या पदार्थांमध्ये आढळणारे एक आवश्यक खनिज आहे. हे पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. झिंकच्या कमतरतेमुळे शुक्राणूंची खराब गुणवत्ता, कमी टेस्टोस्टेरॉन पातळी आणि पुरुष वंध्यत्वाची शक्यता अधिक होऊ शकते. पुरेशा प्रमाणात झिंक सप्लिमेंट्स घेतल्याने तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि शुक्राणूंची संख्या वाढू शकते.
share
(5 / 7)
झिंकचे सेवन फायदेशीर-झिंक हे मासे, मांस, अंडी यासारख्या पदार्थांमध्ये आढळणारे एक आवश्यक खनिज आहे. हे पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. झिंकच्या कमतरतेमुळे शुक्राणूंची खराब गुणवत्ता, कमी टेस्टोस्टेरॉन पातळी आणि पुरुष वंध्यत्वाची शक्यता अधिक होऊ शकते. पुरेशा प्रमाणात झिंक सप्लिमेंट्स घेतल्याने तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि शुक्राणूंची संख्या वाढू शकते.
आहारात व्हिटॅमिन डीचा समावेश-व्हिटॅमिन डी स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजननासाठी आवश्यक आहे. तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी हे आणखी एक पोषक घटक आहे. व्हिटॅमिन डीची उच्च पातळी तुमच्या शुक्राणूंच्या गतिशीलतेमध्ये मदत करते. 
share
(6 / 7)
आहारात व्हिटॅमिन डीचा समावेश-व्हिटॅमिन डी स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजननासाठी आवश्यक आहे. तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी हे आणखी एक पोषक घटक आहे. व्हिटॅमिन डीची उच्च पातळी तुमच्या शुक्राणूंच्या गतिशीलतेमध्ये मदत करते. (pexel)
आहारात या पदार्थांचा समावेश- याशिवाय तुम्ही तुमच्या आहारात गाईचे तूप, आवळा, भोपळ्याच्या बिया, त्रिफळा, अश्वगंधा, त्रिफळा आणि जायफळ यांचा समावेश केल्यास तुमची प्रजनन क्षमता सुधारू शकते. शिवाय तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. 
share
(7 / 7)
आहारात या पदार्थांचा समावेश- याशिवाय तुम्ही तुमच्या आहारात गाईचे तूप, आवळा, भोपळ्याच्या बिया, त्रिफळा, अश्वगंधा, त्रिफळा आणि जायफळ यांचा समावेश केल्यास तुमची प्रजनन क्षमता सुधारू शकते. शिवाय तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. (pexel)
इतर गॅलरीज