सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. बुध ग्रह ४ सप्टेंबररोजी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करत आहे. १६ सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करत आहे. १८ सप्टेंबर रोजी शुक्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करत आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे बुद्धादित्य योग तयार होत आहे. या ग्रहांची हालचाल काही राशींसाठी प्रतिकुल ठरत आहे, कोणत्या राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडत आहे ते जाणून घ्या.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना अडचणीचा राहील. सूर्य जेव्हा तुमच्या लग्नघरात प्रवेश करतो तेव्हा तुमच्यात राग आणि अहंकार वाढू शकतो. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवनात काही मतभेद होऊ शकतात. पैशांबाबतही सावधगिरी बाळगा.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींना ग्रहांच्या स्थितीमुळे जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. याच महिन्यात सूर्य ग्रह तुमच्या चौथ्या भावात प्रवेश करणार आहे. या काळात आरोग्याला त्रास होईल. या काळात आर्थिक खर्चही जास्त होण्याची शक्यता आहे.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी या महिन्याची सुरुवात अनुकूल राहील. परंतु महिन्याच्या मध्यात तुम्हाला व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमच्या कामात अनेक अडथळे येऊ शकतात. विरोधक किंवा शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. या काळात आर्थिक अडचणी निर्माण होतील. पैसे काळजीपूर्वक खर्च करण्याचा सल्ला दिला जातो.