Arun Govil: अरुण गोविल यांना रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेतून एवढी प्रसिद्धी मिळाली की, आजही जेव्हा जेव्हा लोक 'राम' हे नाव ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात अरुण गोविल यांची प्रतिमा येते.
(1 / 10)
‘रामायणा’त रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल मेरठ-हापूर लोकसभा मतदारसंघात विजयी झाले. भाजपचे नवनिर्वाचित खासदार अरुण गोविल त्यांच्या विजयाने भारावून गेले आहेत.
(2 / 10)
अरुण गोविल यांना रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेतून एवढी प्रसिद्धी मिळाली की, आजही जेव्हा जेव्हा लोक 'राम' हे नाव ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात अरुण गोविल यांची प्रतिमा येते.
(3 / 10)
अरुण गोविल यांना ‘रामायण’ मालिकेतून प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. पण, एक वेळ अशी आली की 'रामा'ची भूमिका केल्यानंतर अरुण गोविल यांना व्यावसायिक चित्रपट मिळणे बंद झाले.
(4 / 10)
एवढेच नाही तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अरुण गोविल यांना सुरुवातीला ‘रामा’च्या भूमिकेसाठी नाकारण्यात आले होते. रामानंद सागर यांना त्यांची धूम्रपानाची सवय अजिबात आवडली नाही. या कारणास्तव त्यांना नकार देण्यात आला होता.
(5 / 10)
मात्र, जेव्हा अरुण गोविल यांनी लूक टेस्टमध्ये त्यांचं सुंदर स्मित हास्य दाखवलं, तेव्हा रामानंद सागर यांना त्यांचं हेच स्मित हास्य इतकं आवडलं की, त्यांनी अरुण गोविल यांना रामाची भूमिका देऊ केली.
(6 / 10)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरुण गोविल यांची ‘रामा’ची प्रतिमा इतकी मजबूत होती की, या मालिकेनंतर इतर दिग्दर्शक आणि निर्मात्यांना त्यांना कोणती भूमिका द्यायची, हेच कळत नव्हते.
(7 / 10)
दिग्दर्शक आणि निर्माते त्यांना सांगायचे की, प्रेक्षकांनी तुम्हाला राम म्हणून डोक्यावर उचलून धरले होते. मात्र, आता त्यांना तुला इतर कोणत्याही भूमिकेत पाहण्याची इच्छा नाही.
(8 / 10)
अरुण गोविल यांना ‘रामायण’च्या ‘राम’ या भूमिकेमधून ओळख मिळाली. पण, अभिनयाच्या दुनियेत त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो ताराचंद बडजात्या यांच्या ‘पहेली’ या चित्रपटातून.
(9 / 10)
‘रामायण’ या शोपूर्वी अरुण गोविल यांनी 'सावन को आने दो' (१९७९), 'सांच को आंच नहीं' (१९७९) आणि 'इतनी सी बात' (१९८१), 'हिम्मतवाला' (१९८३), 'दिलवाला' (१९८६) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
(10 / 10)
तर, रामायण शोनंतर अरुण गोविल 'हथकडी' (१९९५) आणि 'लव कुश' (१९९७) सारख्या चित्रपटांमध्ये दिसले. अलीकडे अरुण गोविल 'आर्टिकल ३७०', 'ओमजी २' आणि 'ज्युबली' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकले होते.