१७ कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात एकूण लोकसंख्येच्या ८ टक्के हिंदू आहेत. देशात सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक हिंदूंवरही हल्ले होत आहेत. या हल्ल्यात ४५ हिंदू जखमी झाले असून एका शाळेतील शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.
(AFP)माजी पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी झाल्यानंतर हिंदू अल्पसंख्याक समुदायाविरुद्ध झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ शेकडो बांगलादेशी हिंदू ढाक्यातील रस्त्यांवर निदर्शने करत आहेत.
(AFP)बांगलादेशातील हिंदू समुदायाच्या सदस्यांनी ढाक्यातील एका प्रमुख चौकात रास्ता रोको करत 'आम्ही कोण आहोत, बंगाली बंगाली' अशा घोषणा दिल्या आणि हिंदूंवरील हिंसाचार थांबविण्याची मागणी करणारे फलक हातात घेतले.
(AFP)विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उठावानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर हिंदूंच्या अनेक व्यवसायांना आणि घरांना लक्ष्य करण्यात आले, याचे एक कारण हिंदू संघटना शेख हसीना आणि अवामी लीगला पाठिंबा देत असल्याचा समज होता.
(AFP)मोहम्मद युनूस यांनी हंगामी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे आंदोलन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी बांगलादेशातील हिंसाचाराचा निषेध केला असून देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, असे आवाहन
केले आहे.(AFP)