‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. आ मालिकेत नेत्रा आता गर्भवती असून, लवकरच बाळांना जन्म देणार आहे. मात्र, नेत्राच्या गर्भातील बाळावर विरोचक दैत्याची दुष्ट नजर आहे. आता विरोचकाला संपवण्यासाठी स्वतः त्रिनयना देवीच नेत्राची मदत करणार आहे.
नेत्रा व राजाध्यक्ष कुटुंबाला त्रिनयना देवीचा आशीर्वाद कळला आहे. हा आशीर्वाद म्हणजे नेत्रा पाच नाही, तर सात महिन्यांची गर्भवती आहे. यासोबतच नेत्राला जुळी मुलं होणार असल्याची बातमी कळताच सगळ्यांच्याच आनंदाला पारावार उरलेला नाही. राजाध्यक्ष कुटुंब विरोचकाला या जुळ्या मुलांची कुठल्याच प्रकारे माहिती न देण्याचं ठरवतात.
आता त्रिनयना देवीनेच विरोचकाचा वध रचला आहे. या विचाराने जल्लोषात नेत्राचं डोहाळेजेवण साजरं होतं आणि नेत्राला प्रसूतीकळा सुरू होतात. रुपालीही त्याचसाठी सज्ज झालेली असताना अद्वैत नेत्राला रुपालीच्या तावडीतून वाचवत हॉस्पिटलला घेऊन जायला निघतो. इंद्राणी व राजाध्यक्ष कुटुंब रुपालीला घरात थोपवून धरतात. अद्वैत नेत्राला हॉस्पिटलला घेऊन चाललेला असतानाच गाडी बिघडते.
उपाय म्हणून अद्वैत हातगाडीवरून नेत्राला घेऊन जात असताना, त्या हातगाडीचं चाक निखळतं आणि तेव्हाच नेत्राचा जीव वाचवायला एक हात येऊन ती हातगाडी धरतं आणि दिसतं की, नेत्राला घेऊन जाणारी, अद्वैतच्या मदतीला धावून आलेली, डॉक्टरचा वेश धारण केलेली व्यक्ती स्वतः त्रिनयना देवी आहे. ती त्रिनयना देवीच्या मंदिरालाच हॉस्पिटल म्हणून सांगत नेत्राला मंदिरात घेऊन जाते.
नेत्राच्या प्रसूतीवेळी त्रिनयना देवीच्या मंदिरात एक दिव्य प्रकाशझोत पसरतो आणि नेत्रा २ बाळांची आई होते. देवी तिच्या मूर्त रूपात दर्शन देत, नेत्राच्या हाती कट्यार देते. तिची पूर्वसूचना मिळण्याची जी ताकद आहे, ती विरोचक वधासोबतच नष्ट होईल असं सांगते. आता नेत्रा विरोचकाचा वध करणार आहे. वध होताच त्रिनयना देवीवर रक्ताचा अभिषेक होणार आहे. परंतु, त्यावेळीच मालिकेत ट्वीस्ट येणार आहे. काय असेल या मागचं रहस्य? हे लवकरच कळणार आहे.