१८ मार्च रोजी शनीने स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत संक्रमण केले आहे. शनिग्रहाच्या या संक्रमणामुळे तीन राशींना खूप फायदा होणार आहे. या राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया…
शास्त्रानुसार शनि कर्मफलदाता आहे. अर्थात तो प्रत्येकाला कर्माचे फळ देतो. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी अडीच वर्षे लागतात. शनिदेवाला प्रत्येकजण घाबरतो. कारण तो कर्मांचे फळ देणारा देव आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तुमच्या कुटुंबात सुख-शांती नांदेल. या काळात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. येणारा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे.
(Freepik)तूळ राशीच्या लोकांसाठी येणारा काळ चांगला परिणाम देईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. तुम्ही कोणत्याही व्यवसायात यशस्वी व्हाल. तुमच्या प्रेम जीवनातील अडथळे दूर होतील.
धनु राशीच्या लोकांना शनीचे संक्रमण लाभदायी ठरणार आहे. तुमच्या मदतीसाठी एखादा मित्र पुढे येईल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही मागील बऱ्याच काळापासून आजारी असाल, तर यावेळी तुमच्या तब्येतीत सुधारणा होणार आहे.