India vs England Test series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांपैकी चार कसोटी सामन्यांची मालिका संपली आहे. आणखी एक सामना शिल्लक असताना भारताने मालिका ३-१ अशी जिंकली. या मालिकेत दोन्ही संघांसाठी सहा खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले आहे.
(1 / 6)
भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने राजकोट येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसामन्यातून कसोटी पदार्पण केले. रांची येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावात नाबाद ३९ धावांची खेळी करत त्याने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (ANI)
(2 / 6)
विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताकडून फलंदाज रजत पाटीदारने कसोटी पदार्पण केले. त्याने आतापर्यंत सहा डावांत केवळ ६३ धावा केल्या आहेत, ज्यात दोन डकचा समावेश आहे. (AFP)
(3 / 6)
भारताचा युवा वेगवान गोलंदाज आकाशदीपने रांची येथे तिसऱ्या कसोटीत कसोटी पदार्पण केले आणि पहिल्या डावात तीन विकेट घेतले. (ANI)
(4 / 6)
भारताचा फलंदाज सरफराज खानने राजकोट येथे तिसऱ्या कसोटीसामन्यातून कसोटी पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात दोन्ही डावात अर्धशतके झळकावली होती. (PTI)
(5 / 6)
भारताविरुद्ध हैदराबादयेथे झालेल्या पहिल्या कसोटीत पदार्पण करणारा इंग्लंडचा फिरकीपटू टॉम हार्टलीने आतापर्यंत चार कसोटीत विकेट घेतले आणि १५९ धावा केल्या आहेत. (PTI)
(6 / 6)
इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीरने विशाखापट्टणम येथे दोन सामन्यांतून कसोटी पदार्पण केले. रांची कसोटीच्या पहिल्या डावात त्याने पाच विकेट्स घेतल्या.(PTI)